Patriot Day 2020 Quotes And HD Images: 9/11 मधील दहशतवादी हल्ल्याला 19 वर्ष पूर्ण, 'या' भावनात्मक मेसेच्या माध्यमातून हल्ल्यातील पीडितांना करा सलाम

Patriot Day 2020 Quotes And HD Images: अमेरिकेत (US) झालेल्या 9/11 दहशतवादी हल्ल्याला आज 19 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर 2001 मध्ये अलकायदा या दहशवादी संघटनेने 10 दहशतवाद्यांच्या मदतीने अमेरिकेतील वर्ल्ड सेंटर (World Trade Centre), पेंटागन आणि पेंलिसवेनिया येथे एकत्रितपणे दहशतवादी हल्ला केला होता. आजच्या दिवशी 19 वर्षांपूर्वी देशातील सर्वात श्रेष्ठ मानल्या जाणार देशात एवढी मोठी घटना घडली होती. या घटनेचा प्रत्येक क्षण लोकांच्या मनात घर करुन असून तो कधीच न विसरता येणारा आहे. या दहशतवादी हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी 4 प्रवासी विमान हायजॅक केले होते. दहशतवाद्यांनी 2 प्रवासी विमान वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या मधून टाकले होते. तर तिसरे विमान पेंटागन आणि चौथ्या विमानाने पेंसिलवेनियाला निशाण बनवले होते. या दहशतवादी हल्ल्यात जवळजवळ 2966 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 57 देशातील लोकांचा समावेश होते. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच 2 तासात संपूर्ण इमारत पडल्याचे दिसून आले होते.

आज अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याला 19 वर्ष पूर्ण झाली आहेत. या वेदनादायक घटनेची आठवण जरी केली तरीही लोकांचा थरकाप उडतो. हल्ल्यात ठार झालेल्या लोकांची आठवण फक्त अमेरिकाच नव्हे तर संपूर्ण जगभरातून काढली जाते. तर तुम्ही सुद्धा या काही भावनात्मक मेसेज, Quotes,HD Images च्या माध्यमातून हल्ल्यातील पीडितांना द्या श्रद्धांजली.

Patriot Day 2020 (Photo Credits-File Image)

 

Patriot Day 2020 (Photo Credits-File Image)
Patriot Day 2020 (Photo Credits-File Image)
Patriot Day 2020 (Photo Credits-File Image)
Patriot Day 2020 (Photo Credits-File Image)

दरम्यान असे सांगितले जाते की, या हल्ल्यापाठी अलकायदा प्रमुख ओसामा बिन लादेन याचा हात होता. या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने ओसामा याला अद्दल घडवण्यासाठी 2 मे 2011 मध्ये पाकिस्तानमधील एबटाबाद येथे त्याला ठार मारले. वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये झालेल्या दहशतावदी हल्ल्यानंतर 104 मजल्याची इमारत नव्याने पुन्हा उभारली गेली. नव्या इमारतीत जुन्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या आठवणी कायम ठेवण्यासाठी एक स्मारक आणि संग्रहालय उभारण्यात आले आहे.