Happy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा
National Parents Day (Photo Credits-Facebook)

 Happy Parents Day Quotes in Marathi:  आपल्या आई-वडिलांचा सन्मान करण्यासाठी  25 जुलै राष्ट्रीय पालक दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी पालकांनी आपल्या मुलांसाठी केलेले कष्ट आणि त्यांच्या मेहनीचा आदर करत त्यांचे आभार मानले जातात. प्रत्येकाच्या आयुष्यात पालक हे नेहमीच उच्च स्तरावर असून त्यांनी दिलेली शिकवण नेहमीच मुलाला पुढील आयुष्य उत्तम जगण्यासाठी मदत करते. या दिवशी आपल्या पालकांचे आभार मानण्यास विसरु नका. तसेच नेहमीच त्यांचे विचार आचरणात आणून त्या मार्गाने आयुष्याची वाटचाल करा.

आयुष्यभर, आपले पालक आपल्याला स्वतंत्र विचारसरणीचे व्यक्ती बनतात. आपल्यातील बहुतेकजणांना माहित आहे की ते प्रयत्न आव्हानात्मक असू शकतात. जग सध्या खुप वेगाने बदलच चालले आहे.अशा काळात आपल्याला असलेला पालकांचा आधार हाच आपल्यासाठी सर्वात मोठे पाठबळ असल्याचे म्हणण्यास हरकत नाही. त्यामुळे राष्ट्रीय पालक दिवसानिमित्त हे काही विचार तुम्हाला आयुष्य जगण्यास शिकवतीलच पण त्यामधून प्रेरणा घेत तुम्ही सुद्धा योग्य मार्गावरुन चालण्यास विसरु नका. (Happy Parents Day 2021 Wishes: जागतिक पालक दिनाच्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status, Stickers द्वारा देत व्यक्त करा कृतज्ञता)

>आई-वडिल वयाने नव्हे तर काळजीने म्हातारे होतात हे कटू आहे पण सत्य आहे

>>आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे आई-बाबांच्या चेहऱ्यावर सुखद हास्य आणि त्याच कारण तुम्ही स्वत: असणं!

>>हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई-वडिल पुन्हा मिळणार नाही

>>न हरता न थांबता प्रयत्न कर बोलणारे 'आई-वडील'च असतात

>>आयुष्यात जिथे पर्याय म्हणून कोणी नसते तिथे उत्तर म्हणून 'आई-बाबा' असतात

तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरणापर्यंत, त्यांनी आपलं “सारं आयुष्य” खर्च केलेलं असतं त्या थोर व्यक्ती म्हणजे तुमचे आईवडिल. आईवडिल यांचे महत्व शब्दांत सांगता येणार नाही. कारण हे केवळ दोन शब्द नसून प्रत्येक पाल्याचे संपूर्ण आयुष्य आहे. आपल्या पाल्यासाठी दिवसरात्र झटणा-या सर्व पालकांना राष्ट्रीय पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!