Happy Parents Day 2021 Wishes: जागतिक पालक दिनाच्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status, Stickers द्वारा देत व्यक्त करा कृतज्ञता
Happy Global Day of Parents 2021।File Image

जून महिन्याची सुरूवात ही Global Day Of Parents 2021 ने होते. या दिवसाच्या निमित्ताने जगभरातील पालकांनी त्यांच्या मुलांसाठी, पाल्यांसाठी केलेल्या त्यागाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा, त्यांच्या नात्याला दृढ करण्याची एक संधी असते. दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने एक विशेष थीम असते आणी त्याभोवती सेलिब्रेशन असतं. यंदा 2021 सालची थीम "Appreciate all parents throughout the world" आहे. जगभरातील पालकांची वचनबद्धता आणि निःस्वार्थ प्रेम यांना साजरं करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने (UN)  हा दिवस घोषित केला आहे. मग आजच्या दिवशी Facebook Messages, Wishes, HD Images, Photos यांच्यामाध्यमातून शुभेच्छा देत हा दिवस थोडा खास बनवूया.

मागील दीड वर्षांच्या कोरोना पॅन्डेमिकच्या काळात कुटुंब काय असतं, कठीण प्रसंगात त्यांची साथ किती महत्त्वाची असते याची प्रचिती पावलापावलांवर आली आहे. त्यामुळे आज पालकांपासून दूर असलेल्या किंवा अगदी या कोरोना संकटकाळात 24 तास भक्कम आधार बनलेल्या तुमच्या कुटुंबाला आजच्या दिवशी एकदा थॅक्यू नक्की म्हणा. June 2021 Holidays, Festivals & Events: वटपौर्णिमा, योगा डे, पर्यावरण दिन- जून महिन्यात येणाऱ्या सण आणि महत्त्वाच्या दिवसांची संपूर्ण यादी येथे पहा.

पालकदिनाच्या शुभेच्छा

Happy Global Day of Parents 2021।File Image
Happy Global Day of Parents 2021।File Image
Happy Global Day of Parents 2021।File Image
Happy Global Day of Parents 2021।File Image
Happy Global Day of Parents 2021।File Image

Happy Parents' Day 2021 WhatsApp Stickers च्या माध्यमातूनही आता तुम्ही पालकांना आजच्या पॅरेंट्स डे च्या निमित्ताने शुभेच्छा देऊ शकता. प्रत्येक घराचा कणा हा त्यांचं कुटुंब असतं. अनेक आपण जवळच्या व्यक्तींना गृहीत धरतो पण त्यांची खरी किंमत ही कठीण काळातच समजते. म्हणूनच ती वेळ येईपर्यंत थांबू नका. आई-वडीलांसह तुमचं कुटुंब आजच्या दिवशी एकसंध ठेवण्यसाठी प्रयत्न करा आणि वेळोवेळी त्यांच्याप्रती आपला आदर व्यक्त करा.