Palm Sunday 2020: जाणून घ्या ख्रिस्चन बांधव का साजरा करतात 'पाम संडे'चा दिवस; या सणाचे महत्व व इतिहास
Holy Week of Easter (Photo Credits: Pixabay)

सर्वसामान्यपणे येशू ख्रिस्त  (Jesus Christ) यांना मानवतेचा अवतार मानला जातो, ज्यांनी मानवाच्या कल्याणासाठी हसता हसत सुळावर जाणे पसंत केले. काही ठिकाणी असेही म्हटले जाते की- ‘Jesus died for our sins’. तर गुड फ्रायडे (Good Friday) च्या दिवशी येशूला वधस्तंभावर चढवण्यात आले, त्याच्या आदल्या रविवारी येशूचे जेरुसलेम (Jerusalem) नगरीत आगमन झाले होते. येशूचा नगरीत झालेला प्रवेश हा तिथल्या नागरिकांनी खजुराची पाने दाखवून साजरा केला होता. त्या दिवसाची आठवण म्हणून आजही जगभरातील ख्रिस्ती बांधव हा दिवस 'पाम रविवार' किंवा 'पाम संडे' (Palm Sunday) म्हणून साजरा करतात. यंदा हा दिवस रविवार, 5 एप्रिल रोजी साजरा केला जाईल.

पाम संडेला पवित्र आठवड्याची (Holy Week) सुरुवातही मानली, ज्याचा शेवट इस्टर (Easter) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाविषयी पवित्र बायबल म्हणते की, जेव्हा प्रभु येशू जेरूसलेमला पोहचले, तेव्हा मोठ्या संख्येने लोक त्याचे स्वागत करण्यासाठी हातात खजुराची पाने घेऊन उभे होते. तिथल्या जनतेने प्रभु येशूची शिकवण व चमत्कारांचे जोरदार स्वागत केले. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.

यादिवशी जगभरातील चर्चेस मध्ये खास मास म्हणजे खास प्रार्थनेचे आयोजन केले जाते. खजुराच्या पानांना या दिवशी खास महत्व असते, या पानांचा क्रॉस बनवन्याची प्रथा आहे. या प्रकारचे खास क्रॉस घरात किंवा गाडीत ठेवले जाते. प्राचीन काळात खजुराचे झाड हे विजय आणि चांगुलपणा यांचे प्रतिक मानले जायचे व त्यामुळे आजही या झाडाचे विशेष महत्व आहे. (हेही वाचा: चैत्री यात्रा कामदा एकादशी निमित्त विठुरायाच्या गाभाऱ्यात लाल गुलाबांच्या फुलांची आरास; पहा फोटो)

ख्रिस्चन समाजामध्ये गुड फ्रायडेच्या आधी 40 दिवस शोककाळ असतो, ज्याची सुरुवात 'Ash Wednesday' पासून होते. या दिवशी, ‘राख बुध’ची धार्मिक विधी संपन्न होते व पाद्री जमलेल्या लोकांच्या माथ्यावर राख लावतात. या 40 दिवसात लोक प्रार्थना करतात, घडलेल्या चुकांबद्दल पश्चात्ताप करतात, दान करतात आणि उपवास करतात. हा कालावधी इस्टर च्या दिवशी संपतो. या दुःख काळात ‘पाम संडे’ हा एक आनंदाचा दिवस साजरा केला जातो.