आज श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या (Vitthal Rukmini Temple Committee) वतीने चैत्री यात्रा (Chaitri Yatra) कामदा एकादशी (Kamada Ekadashi 2020) निमीत्त विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभार्यात व मंदिरात गुलाबाच्या फुलाची (Rose Flowers) सुंदर आरास करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या राज्यातील सर्व धार्मिक स्थळं बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे यावेळी पहिल्यांदा पंढरपूरच्या विठूरायाला कुलूपबंद असताना गुलाबाच्या फुलांची आरास घालण्याची वेळ आली आहे.
आज सर्वत्र हिंदू नववर्षातील पहिली एकादशी म्हणजेच कामदा एकादशी साजरी होत आहे. आज पंढरपुरला चैत्री वारी सोहळा पार पडत असतो. परंतु, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हा चैत्री वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. आज कामदा एकादशीच्या निमित्ताने आमदार सुरजितसिंह ठाकूर यांच्याहस्ते विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. (हेही वाचा - Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टाळी, थाळी व दिवाळी कार्यक्रम दुर्दैवी - पृथ्वीराज चव्हाण)
प्रत्येक वर्षी चैत्री यात्रेला पंढरपुरात लाखो भाविक उपस्थित असतात. मात्र, यंदा पहिल्यांदाच हा सोहळा कुलुपबंद मंदिरात सादरा करण्यात आला. वारकरी संप्रादयाची पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वारीच्या परंपरेत आज खंड पडला आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 500 पेक्षा जास्त झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी घरात राहावं. महावीर जयंती, हनुमान जयंती आणि त्याचरात्री असलेल्या ‘शब्ब-ए-बारात’साठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. यावर्षीची पूजाअर्चा, धार्मिक प्रार्थना सर्वांनी आपापल्या घरातच करावी, असं आवाहन अजित पवार यांनी राज्यातील सर्व नागरिकांना केलं आहे.