National Youth Day 2024 HD Images: दरवर्षी 12 जानेवारी रोजी संपूर्ण भारतात राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day 2024) उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी स्वामी विवेकानंदांची जयंती (Swami Vivekananda Jayanti) असते. भारत सरकारने 1984 मध्ये, स्वामी विवेकानंदांची जयंती राष्ट्रीय युवा दिन (Rashtriya Yuva Din) म्हणून साजरी करण्याची घोषणा केली. 1985 पासून राष्ट्रीय युवा दिन दरवर्षी 12 जानेवारीला म्हणजेच स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिनी साजरा केला जातो.
हा दिवस युवा दिन म्हणून साजरा करण्यामागचा उद्देश स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे आणि आदर्शांचे महत्त्व वाढवणे हा आहे. यासाठी तुम्ही स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाच्या खास शुभेच्छा सोशल मीडियाच्या माध्यमातून Messages, Wishes, WhatsApp Status द्वारे आपल्या मित्र-परिवारास पाठवू शकता. (हेही वाचा - Swami Vivekananda’s Quotes: स्वामी विवेकानंद यांचे तरूणाईला प्रेरणा देणारे विचार सोशल मीडीयात शेअर करत साजरा करा National Youth Day 2022)
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त
तुम्हाला राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा!
राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
राष्ट्रीय युवा दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
राष्ट्रीय युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
स्वामी विवेकांनंद यांच्या जयंती निमित्त
साजरा करण्यात येणाऱ्या
राष्ट्रीय युवा दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
देशाचे भवितव्य देशातील तरुणांवर अवलंबून आहे. त्यामुळे कोणत्याही देशातील युवकांचे त्या देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान असते. त्यामुळे तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो.