
Surya Namaskar Day 2023 Wishes: भारतीय तिथी माघ महिन्यातील रथ सप्तमी ला जागतिक सूर्यनमस्कार दिवस (World Surya Namaskar Day 2023) साजरा केला जातो. या दिवशी विविध ठिकाणी सकाळी सूर्योदयाला सुर्यनमस्कार स्पर्धा आयोजित केल्या जातात. सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते. सूर्यनमस्काराने उत्तम व्यायाम होतोच तसेच आत्मिक, मानसिक, व शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होते.
सूर्यनमस्कार हा 8 आसनांचा एक संच आहे जो 12 चरणांमध्ये केला जातो. सूर्याच्या प्रत्येक किरणांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीदेखील सूर्यनमस्कार केला जातो. सूर्याचे किरण प्रत्येक सजीवाचे पोषण करते. सूर्य, उर्जेचा प्राथमिक स्त्रोत असून अन्न साखळीचे चक्र टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतो. याशिवाय सूर्य मानवी मन आणि शरीराला देखील ऊर्जा देतो. त्यामुळे हा दिवस सर्वांसाठी खूप खास असतो. जागतिक सूर्य दिनानिमित्त तुम्ही आपल्या मित्र-परिवारास WhatsApp Status, Quotes, Messages द्वारे खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील.
सूर्यनमस्कार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सूर्यनमस्कार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

सूर्यनमस्कार दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

तुमचे आरोग्य नेहमी निरोगी राहो!
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
सूर्यनमस्कार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

तुम्हाला व तुमच्या परिवाराला
सूर्यनमस्कार दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

सूर्यनमस्कार करणं आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. सूर्याच्या किरणांमध्ये व्हिटॅमिन डी असतं. आपल्या शरीरासाठी हे व्हिटॅमिन अत्यंत आवश्यक आहे. याची पूर्तता सूर्याच्या किरणातून पूर्ण होते.