Shravan Somwar 2023 Wishes: देवांचा देव महादेवाच्या पूजेसाठी श्रावन महिना सर्वोत्तम मानला जातो. श्रावन महिन्यात भगवान भोलेनाथाची पूजा केल्याने अनेक मनोकामना पूर्ण होतात. या महिन्यात शिवलिंगाचा अभिषेक शुभ आणि फलदायी मानला जातो. 24 जुलै 2023 हा श्रावन महिन्याचा तिसरा सोमवार आहे. या दिवशी भगवान शिवाची पूजा विधीनुसार केली जाते. या दिवशी भक्त भगवान शिवाला जलाभिषेक करून प्रसन्न करतात आणि शिवालयात पोहोचून त्यांची पूजा करतात. श्रावन महिन्यातील प्रत्येक सोमवार व्रत आणि उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. श्रावण सोमवारचे व्रत ठेऊन महादेवाची पूजा केल्याने भक्तांचे सर्व दुःख नाहीसे होतात, असे सांगितले जाते.
श्रावन महिना हा भगवान शंकराचा आवडता महिना आहे. या महिन्यातील सर्व सोमवार अतिशय शुभ मानले जातात. या दिवशी जो मनुष्य श्रावन सोमवारचे व्रत खऱ्या मनाने ठेऊन भगवान भोलेनाथाची पूजा करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. श्रावण सोमवार निमित्त SMS, Wishes, Images, Whatsapp आणि Facebook Status च्या माध्यमातून शेअर करुन तुम्ही शिवभक्तांना खास शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - श्रावण सोमवार च्या शुभेच्छा मराठी संदेश, Wishes, Whatsapp Status, च्या माध्यमातून शेअर करून श्री शंकराचे करा स्मरण)
श्रावण मास होता सुरु,
शिवशंकराची पूजा करू
शंकराचा तुमच्यावर आशीर्वाद
राहो या सदिच्छा
श्रावणी सोमवारच्या सर्वांना शुभेच्छा!
शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे
शिव अनंत, शिव ब्रम्ह आहे
शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती
श्रावणी सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
श्रावण मासाला झाला प्रारंभ
करू शिवाच्या पूजेला आरंभ
ठेऊ शिवाचे व्रत
होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण
श्रावणी सोमवारच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
शिव हरी शंकर,नमामी शंकर
शिव शंकर शंभो
हे गिरीजापती भवानी शंकर
शिव शंकर शंभो
श्रावणी सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
अदभुत आहे तुझी माया,
नीळकंठाची तुझी छाया,
अमरनाथमध्ये केला वास,
तुच आमच्या मनात वसलास.
हर हर महादेव…
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, ध्यान करावे आणि भगवान शंकराचा जलाभिषेक करावा. या वेळी त्यांना अक्षत, गंध, फुले, धूप, दिवा, दूध, पंचामृत, बेलपत्र, भांग, धतुरा इत्यादी अर्पण करा. यासोबतच पंचामृताने अभिषेक करताना 'ओम नमः शिवाय' या मंत्राचा सतत जप करावा.