Savitribai Phule Punyatithi 2024 HD Images: देशातील पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांची आज पुण्यतिथी. 10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले. दरवर्षी या दिवशी देश त्यांचे स्मरण करतो आणि श्रद्धांजली अर्पण करतो. महिला सक्षमीकरणाचे ते प्रतीक आहे. सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला.
सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासमवेत पुण्यात मुलींची पहिली शाळा उघडली. याशिवाय त्यांनी विधवा महिलांना पुनर्विवाह करण्यासही प्रोत्साहन दिले. सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही सोशल मीडीयात व्हॉट्सॅप, फेसबूक स्टेटस, मेसेजद्वारे तुम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करू शकता.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन!
स्त्री शिक्षणाच्या जननी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना
स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोटी कोटी प्रमाण!
सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्रिवार अभिवादन..!
भारतातील प्रथम महिला
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना
स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन!
सामाजिक भेदभाव आणि अनेक अडथळ्यांना न जुमानता सावित्रीबाई फुले यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि इतर महिलांनाही शिक्षण देण्याचे काम हाती घेतले. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि स्त्री मुक्ती चळवळीच्या पहिल्या नेत्या होत्या.