Rang Panchami 2025 Quotes In Marathi (फोटो सौजन्य - File Image)

Happy Rang Panchami 2025 Quotes In Marathi: रंगपंचमी (Rang Panchami 2025) चा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा बुधवारी, 19 मार्च रोजी रंगपंचमी साजरा करण्यात येणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांनी रंगपंचमीच्या दिवशी एकत्र होळी (Holi 2025) खेळतात. ही होळी पाहण्यासाठी देव-देवता देखील पृथ्वीवर येतात. या कारणास्तव दरवर्षी रंगपंचमी साजरी केली जाते.

रंगपंचमीच्या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा देतात. या दिवशी देशाच्या विविध भागात विविध परंपरा साजऱ्या केल्या जातात. तुम्ही देखील रंगपंचमीच्या शुभेच्छा व्हाट्सअॅप स्टेटस, रंगपंचमीच्या शुभेच्छा प्रतिमा, मराठी रंगपंचमीचे कोट्स, रंगपंचमी वालपेपर शेअर करून तुमच्या प्रियजनांना खास Message, WhatsApp Status, Wishes, Images द्वारे मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता.

रंगपंचमी मराठी कोट्स - 

सप्तरंगांची उधळण
आपुलकीचा ओलावा
अखंड राहो नात्यांचा गोडवा
रंगपंचमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

Rang Panchami 2025 Quotes In Marathi 1 (फोटो सौजन्य - File Image)

मजा करा, धमाल उडवा,
रंग उधळा आणि हसत राहा!
रंगपंचमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

Rang Panchami 2025 Quotes In Marathi 2 (फोटो सौजन्य - File Image)

भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
हॅपी रंगपंचमी !

Rang Panchami 2025 Quotes In Marathi 3 (फोटो सौजन्य - File Image)

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

Rang Panchami 2025 Quotes In Marathi 4 (फोटो सौजन्य - File Image)

रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

Rang Panchami 2025 Quotes In Marathi 5 (फोटो सौजन्य - File Image)

पौराणिक कथेनुसार, जेव्हा हिरण्यक्षयप आपल्या बहिणी होलिकासोबत आपला मुलगा प्रल्हादला मारण्यासाठी अग्नीत बसला होता, तेव्हा ते दोघेही 5 दिवस त्या अग्नीत राहिले. पाचव्या दिवशी होलिका मरण पावली आणि प्रल्हाद वाचला. हे पाहून लोक उत्साहित झाले आणि सर्वांनी रंगांनी आनंद साजरा केला. तेव्हापासून रंगपंचमीचा सण साजरा होऊ लागला.