Rajmata Jijau Jayanti 2025 Messages 7 (फोटो सौजन्य - File Images)

Rajmata Jijau Jayanti 2025 Messages: राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) यांचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये 12 जानेवारी 1598 साली झाला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर हायवेला लागूनच आहे. याच वस्तूसमोर नगर पालिका निर्मित एक बगिचा देखील आहे. येथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे. जिजाऊ एक कुशल घोडेस्वार, रणनीतीकार, मुत्सद्दी आणि तलवारबाज देखील होत्या. त्यांच्या याच गुणांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) व्यक्तिमत्व बहुआयामी स्वरुपाचे घडले.

राजमाता जिजाबाई यांचा विवाह मराठा सेनापती आणि शिवाजी महाराजांचे वडील शहाजी भोसले यांच्याशी झाला. त्यांचे लग्न त्यांच्या किशोरावस्थेत झाले होते. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना केवळ गोष्टी सांगितल्या नाही तर जवळ बसवून राजकारणाचे धडे गिरवले. राजमाता जिजाबाई यांच्या जयंतीनिमित्त Wishes, Whatsapp Status, Quotes द्वारे तुम्ही माँसाहेबांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करू शकता.

एक उडाली ठिणगी आणि लाख पेटल्या मशाली,

स्वराज्याच्या संकल्पनेची

जिजामातांमुळे नवी पहाट झाली.

राजमाता जिजाबाई यांच्या जयंती निमित्त

त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन!

Rajmata Jijau Jayanti 2025 Messages 1 (फोटो सौजन्य - File Images)

घडवला असा तू छावा,

ज्याने दिला महाराष्ट्राला

तुझ्या संस्काराचा नवा वसा.

राजमाता जिजाबाई यांना जयंती

निमित्त त्रिवार अभिवादन!

Rajmata Jijau Jayanti 2025 Messages 2 (फोटो सौजन्य - File Images)

जिजाऊ…

ज्यांच्या प्रेरणेने उजळली

स्वराज्यज्योती

याच माऊली ज्यांनी घडवले

श्री शिवछत्रपती

राजमाता जिजाबाईं यांच्या

जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

Rajmata Jijau Jayanti 2025 Messages 3 (फोटो सौजन्य - File Images)

तुम्ही नसता तर नसते झाले

शिवराय अन शंभू छावा

तुमच्या शिवाय नसता मिळाला

आम्हांला स्वराज्याचा ठेवा

जय जिजाऊ!

Rajmata Jijau Jayanti 2025 Messages 4 (फोटो सौजन्य - File Images)

मुजरा माझा माता जिजाऊंना,

जिने घडविले शुर शिवबाला.

साक्षात होती ती आई भवानी,

जिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी!

राजमाता जिजाऊंच्या

जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

Rajmata Jijau Jayanti 2025 Messages 5 (फोटो सौजन्य - File Images)

जननी मराठा साम्राज्याची,

सारूनी बाजूस राजघराणी.

जनतेच्या साऱ्या न्यायाखातर,

लढा लढविली ही रणरागिणी.

जय भवानी ! जय शिवाजी !

जय जिजाऊ

Rajmata Jijau Jayanti 2025 Messages 6 (फोटो सौजन्य - File Images)

------

जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना महान महाकाव्ये आणि लोककथा सांगून रणनीती, मूल्ये आणि धर्माचे महत्त्व शिकवले. त्यांनी त्यांना राजकारणाची कला शिकवली आणि एक न्यायी आणि प्रामाणिक शासक बनण्यासाठी तयार केले. छत्रपती शिवाजी महाराज तसेच जिजाऊ या दोघांचेही मराठा साम्राज्य उभं करण्यात मोठे योगदान आहे.