Rajmata Jijau Jayanti 2025 HD Images: जिजाबाई एक धर्माभिमानी हिंदू होत्या आणि त्यांनी शिवाजी महाराजांमध्ये धार्मिक आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण केली. जीजाऊंनी शिवरायांना मराठ्यांच्या इतिहास आणि संस्कृतीबद्दल धडे दिले. ज्यामुळे त्यांना स्वतंत्र आणि शक्तिशाली मराठा साम्राज्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्यास मदत झाली. जिजामातेमध्ये तीव्र तळमळ, श्रद्धा, दृढनिश्चय, संयम, धर्माबद्दल आदराची भावना, निस्वार्थीपणा, योद्धा वृत्ती, उदार मन, निर्भयता, नेतृत्व, धैर्य, युद्धनीती, त्यागाची वृत्ती तसेच विजयाची इच्छा असे बहुमुखी गुण होते. राष्ट्राप्रती समर्पणाचे बीज पेरून जिजाबाईंनी त्यांना एक आदर्श राजा बनवले. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 साली झाला. आज सर्वत्र जिजाऊंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.
जिजाबाईंनी शिवरायांना स्वतंत्र महाराष्ट्राचे स्वप्न दाखवले. यामुळे तो एक निर्भय आणि खंबीर नेता बनला. जिजाबाई आणि शहाजी भोसले यांना दोन मुलगे होते. जिजाऊ शिवरायांना रोज वेगवेगळ्या शौर्याच्या कथा सांगत असतं. या कथांमुळे शिवबावर राम, कृष्ण, भीम आणि अभिमन्यूसारखे शौर्य दाखवण्याची इच्छा तयार झाली. आज जिजाऊंच्या जयंतीनिमित्त तुम्ही सोशल मीडियाद्वारे HD Images Wishes, Messages, Whatsapp Status शेअर करून माँसाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करू शकता.
अखंड स्वातंत्र्याची प्रेरणा
राजमाता जिजाऊ मांसाहेबांना
जयंतीदिनी त्रिवार मुजरा !
स्वराज्याचा मूलमंत्र देणाऱ्या
राजमाता जिजाऊ
माँसाहेब यांना जयंतीनिमित्त
कोटी कोटी वंदन आणि मानाचा मुजरा !
मुजरा माझा माता जिजाऊला,
घडविले तिने शूर शिवबाला
माँसाहेबांना जयंतीदिनी त्रिवार मुजरा !
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराजांना
घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या
जयंती निमित्त मानाचा मुजरा!
धन्य ती माता जिजाबाई
धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज
धन्य धन्य ते स्वराज...
राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा
निजामशहाच्या आदेशानुसार वडील लखुजीराव जाधव यांची खुल्या दरबारात हत्या झाल्यानंतर जिजाबाईंनी प्रतिज्ञा केली होती की, त्यांचा मुलगा शिवाजी कधीही इतरांच्या सेवेत गुंतणार नाही. तो स्वराज्य म्हणजेच त्याच्या लोकांचे राज्य स्थापन करेल.