Rajmata Jijau Punyatithi 2024 Messages (PC - File Image)

Rajmata Jijau Punyatithi 2024 Messages: राजमाता जिजाऊंचा (Rajmata Jijau) जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी 17 जून 1664 साली जिजाऊंनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी अखेरचा श्वास घेतला. राजमाता जिजाऊ यांनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती व अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले. शिवरायांना जिजाऊंचे संस्कार लाभले, म्हणूनच स्वराज उभे राहिले.

राजमाता जिजाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त तुम्ही आपल्या मित्र परिवारास खास WhatsApp Status, Quotes, Facebook Greetings द्वारे तुम्ही अभिवादन करू शकता. शहाजी भोसले यांच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर जिजाबाईंनी त्यांच्याशी सती जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, शिवाजी महाराजांनी जिजाऊला रोखले.

थोर तुमचे कर्म जिजाऊसाहेब

उपकार कधी ना फिटणार…

चंद्र सूर्य असे पर्यंत

नाव तुमचे न मिटणार…

स्वराज्य प्रेरीका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब

यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!!

Rajmata Jijau Punyatithi 2024 Messages (PC - File Image)

ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं बीज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रोवलं,

त्यांच्या अंगी अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती बाणवली अशा आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान,

राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार वंदन!

Rajmata Jijau Punyatithi 2024 Messages (PC - File Image)

मुजरा त्या मातेला,

जिने घडविला राजा रयतेचा ।।

गनिमांस तिने नमविला,

वसा स्वराज्याचा चालविला।।

राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना

पुण्यतिथीनिमित्त त्रिवार अभिवादन!

Rajmata Jijau Punyatithi 2024 Messages (PC - File Image)

जिजाऊ ची गौरव गाथा

तिच्या चरणी माझा माथा..

स्वराज्यप्रेरिक राजमाता

राजमाता जिजाऊसाहेब भोसले

यांना स्मृतिदिनी मानाचा मुजरा !

Rajmata Jijau Punyatithi 2024 Messages (PC - File Image)

महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली

पहार काढून ज्या माऊलीने

गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला

त्या थोर ‘राजमाता जिजाऊला’ मानाचा मुजरा !

राजमाता जिजाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त

त्यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन!

Rajmata Jijau Punyatithi 2024 Messages (PC - File Image)

जिजाबाईंनी पुत्र शिवाजी महाराज यांच्यात देशभक्ती आणि नैतिक चारित्र्याची बीजे पेरली. आईचे मार्गदर्शन आणि त्यांनी दिलेल्या शिक्षणामुळे शिवाजी भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यासोबतच ते एक शूर योद्धा, महान मराठा शासक, देशभक्त आणि कार्यक्षम प्रशासक बनले.