Gudi Padwa 2025 Invitation Card In Marathi: हिंदू नववर्ष (Hindu New Year 2025), ज्याला नववर्ष असेही म्हणतात. हे हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरे केले जाते. यंदा 30 मार्च रोजी गुढीपाडवा (Gudi Padwa 2025) साजरा करण्यात येणार आहे. भारतातील विविध प्रदेशांमध्ये हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा काळ केवळ उत्सवांचा काळ नसून त्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व देखील आहे, कारण या दिवस भगवान ब्रह्माने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते.
या दिवशी भगवान राम आणि युधिष्ठिर यांच्यासह अनेक देवतांना त्यांच्या सिंहासनावर अभिषेक करण्यात आला होता. विविध राज्ये हा दिवस अद्वितीय परंपरांसह साजरा करतात. गुढीपाडव्याचा सण खरोखरच संपूर्ण देशभरातील हिंदू संस्कृतीच्या समृद्ध विविधतेवर प्रकाश टाकतो. गुढीपाडव्याच्या दिवशी घरासमोर किंवा अंगणात गुढी उभारली जाते. या दिवशी अनेक शुभ कामांची सुरुवात देखील केली जाते. अनेक घरात या शुभ दिवशी विशेष पूजेचे आयोजन केले जाते. तुम्ही देखील गुढीपाडव्याच्या दिवशी पूजेचे आजोजन केले असेल आणि तुम्हाला देखील तुमच्या मित्र-परिवारास या पूजेला आमंत्रित करायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास Invitation Card घेऊन आलो आहोत. तुम्ही या निमंत्रण पत्रिका WhatsApp Messages, Images द्वारे आपल्या मित्र-नातेवाईकांना पाठवू शकता आणि त्यांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा तसेस घरी येण्यासाठी निमंत्रण देऊ शकता.
!! श्री गणेशाय नम:!! श्री स्वामी समर्थ कृपा !!
येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारासा हार्दिक शुभेच्छा !
30 मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त आमच्या घरी पूजेचे आयोजन करण्यात आले असून आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती!
निमंत्रक -
पत्ता -
तारीख -
वेळ -

!! श्री गणेशाय नम:!! श्री स्वामी समर्थ कृपा !!
जल्लोष नववर्षाचा,
मराठी अस्मितेचा,
हिंदू संस्कृतीचा,
सण उत्साहाचा,
मराठी मनाचा
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
30 मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त आमच्या घरी पूजेचे आयोजन करण्यात आले असून आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती!
निमंत्रक -
पत्ता -
तारीख -
वेळ -

!! श्री गणेशाय नम:!!
सोनेरी पहाट
उंच गुढीचा थाट
आनंदाची उधळण
अन् सुखांची बरसात
नव्या वर्षाची सोनेरी सुरुवात
गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा
30 मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त आमच्या घरी पूजेचे आयोजन करण्यात आले असून आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती!
निमंत्रक -
पत्ता -
तारीख -
वेळ -

!! श्री गणेशाय नम:!!श्री स्वामी समर्थ कृपा !!
पालवी चैत्राची
अथांग स्नेहाची
जपणूक परंपरेची
उंच उंच जाऊ दे
गुढी आदर्शाची!
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
30 मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त आमच्या घरी पूजेचे आयोजन करण्यात आले असून आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती!
निमंत्रक -
पत्ता -
तारीख -
वेळ -

!! श्री गणेशाय नम:!!श्री स्वामी समर्थ कृपा !!
निळ्या निळ्या आभाळी
शोभे उंच गुढी
नवे नवे वर्ष आले
घेऊन गुळसाखरेची गोडी
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
30 मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त आमच्या घरी पूजेचे आयोजन करण्यात आले असून आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती!
निमंत्रक -
पत्ता -
तारीख -
वेळ -

हिंदू नववर्ष, ज्याला नववर्ष किंवा नव संवत्सर असेही म्हणतात, हे हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार, विशेषतः चैत्र महिन्यात साजरे केले जाते. गुढीपाडव्याचा सण विशेषत: महाराष्ट्रात मोठ्या उत्साने साजरा केला जातो. गुढीपाडव्याचा सण वाईटावर चांगल्याचा विजय यांचे प्रतीक आहे.