
Happy Gudi Padwa 2025 Wishes In Marathi: गुढी पाडव्याचा सण ( Gudi Padwa 2025) प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गोव्यात साजरा केला जाणारा महत्त्वाचा सण आहे. गुढीपाडव्याचा सण हिंदू नववर्षाची (Hindu New Year 2025) सुरुवात दर्शवितो. हिंदू चंद्र सौर दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केल्या जाणाऱ्या गुढीपाडवा सणाचे सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. यंदा गुढी पाडवा 30 मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल.
गुढी पाडवा हा एक सण आहे जो नवीन सुरुवात, समृद्धी आणि विजयाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली. रावणाचा पराभव केल्यानंतर भगवान रामाच्या अयोध्येत परतण्याशी देखील या सणाचा संबंध आहे, जो वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवितो. गुढीपाडव्याच्या लोक एकमेकांना भेटून तसेच सोशल मीडियाद्वारे मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील गुढी पाडव्याचे कोट्स, मराठी गुढी पाडव्याचे शुभेच्छा संदेश, गुढी पाडवा व्हाट्सअॅप स्टेटस, गुढी पाडव्याच्या शुभेच्छा कोट्स शेअर करून तुमच्या प्रियजनांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा पाठवू शकता.
गुढी पाडव्याच्या मराठी शुभेच्छा -
रेशमी गुढी, कडुनिंबाचं पान,
हे वर्ष तुम्हाआम्हा सगळ्यांना जावो छान,
आमच्या कुटुंबातर्फे तुम्हाला नववर्षानिमित्त सदिच्छा.
हॅपी गुढीपाडवा.

श्रीखंडपुरीची लज्जत,
गुढी उभारण्याची लगबग,
सण आहे आनंदाच आणि सौख्याचा
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

वृक्षांवर सजली आहे नवीन पानांची बहार..
हिरवळीने सुंगधित झाला आहे निसर्ग अपरंपार..
चला उभारूया गुढी,
आनंदाची आणि समृद्धीची..
हॅपी गुढीपाडवा!

जल्लोष नववर्षाचा,
मराठी अस्मितेचा,
हिंदू संस्कृतीचा,
सण उत्साहाचा,
मराठी मनाचा
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

सोनेरी पहाट
उंच गुढीचा थाट
आनंदाची उधळण
अन् सुखांची बरसात
नव्या वर्षाची सोनेरी सुरुवात
गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात पार पडतो. या दिवशी घरासमोर गुढी उभारली जाते. गुढीला रेशमी साडी नेसून त्यावर आंब्याची पाने, कडुलिंबाची पाने, फुलांचा हार लावला जातो. ही गुढी बांबूच्या काठीवर ठेवून त्यावर एक कलश ठेवला जातो. ही गुढी घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा गच्चीवर फडकवली जाते.