
Shahu Maharaj Jayanti 2024 HD Images: छत्रपती राजर्षी शाहू महाराज (Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj) हे मराठ्यांच्या भोंसले घराण्याचे राजा आणि भारताच्या कोल्हापूर संस्थानाचे महाराज होते. समाजसुधारक ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या योगदानाने खूप प्रभावित झालेले, शाहू महाराज (Shahu Maharaj) हे एक आदर्श नेते आणि सक्षम शासक होते. जयश्रीराव आणि राधाबाई यांच्या पोटी 26 जून 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावातील घाटगे राजेशाही मराठा घराण्यात यशवंतराव घाटगे यांचा जन्म झाला. जयसिंगराव घाटगे हे गावप्रमुख होते, तर त्यांच्या पत्नी राधाभाई मुधोळच्या राजघराण्यातील होत्या. तरुण यशवंतरावांनी त्यांची आई केवळ तीन वर्षांची असताना गमावली. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत त्यांचे शिक्षण वडिलांच्या देखरेखीखाली झाले. त्याच वर्षी, कोल्हापूर संस्थानातील राजा शिवाजी चौथा यांच्या विधवा राणी आनंदीबाई यांनी त्यांना दत्तक घेतले.
शाहू महाराजांनी राजकुमार कॉलेज, राजकोट येथे त्यांचे औपचारिक शिक्षण पूर्ण केले आणि भारतीय नागरी सेवेचे प्रतिनिधी सर स्टुअर्ट फ्रेझर यांच्याकडून प्रशासकीय विषयांचे धडे घेतले. 1894 मध्ये वयाच्या आल्यानंतर ते सिंहासनावर आरूढ झाले. शाहू महाराजांची जयंती महाराष्ट्रात मोठ्या उत्साने साजरी केली जाते. राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती (Shahu Maharaj Jayanti 2024) निमित्त खास मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Quotes, Imgaes, Greetings सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वर शेअर करुन तुम्ही लोककल्याणकारी राजाच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.
लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना
जयंती निमित्त त्रिवार अभिवादन!

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या
जयंती निमित्त अभिवादन!

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना
जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!

लोकराजा राजर्षी शाहू महाराज
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

राजर्षी शाहू महाराज
यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!

राजर्षी शाहू महाराजांनी 1894 मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीपासून ते 1922 मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी आपल्या राज्यातील खालच्या जातीच्या लोकांसाठी अथक परिश्रम घेतले. जाती-धर्माचा विचार न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे प्राधान्य होते.