
Chhatrapati Sambhaji Maharaj Punyatithi 2025 Messages: संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यात आणि ते स्वराज्य वाढवण्यात शंभूराजांची मोठी भूमिका होती. शंभूराजांच्या आईचे निधन ते लहान असताना झाले. त्यामुळे त्यांचा सांभाळ आजी जिजाऊ यांनी केला. त्यामुळे शिवाजी महाराजांवर ज्या जिजाऊंनी संस्कार केले त्याच जिजाऊंनी शंभूराजांना देखील स्वराज्यांचे धडे गिरवले.
शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्य वाढवण्यासाठी शंभूमहारांजांनी मुघलांसोबत अनेक लढाय्या केल्या. औरंगजेबाने मोठा दगाफटका करत शंभूराजांना पकडलं. त्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराजांनी कठोर यातना देऊन मृत्यू दिला. 29 मार्च रोजी संभाजी महाराजांची तिथीनुसार, पुण्यतिथी साजरी करण्यात येते. यालाचं बलिदान दिन (Balidan Din) किंवा बलिदान मास (Balidan Maas) असंही म्हटलं जातं. संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त WhatsApp Status, Wishes, Quotes द्वारे तुम्ही शंभूराजांना त्रिवार वंदन करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज, ग्रीटिंग्ज मोफत डाऊनलोड करू शकता.
ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
“जय संभाजी” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते…
छत्रपती संभाजी महाराजांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!

सिंहाची चाल,
गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…..
जय संभाजी
जय शंभुराजे
संभाजी महाराजांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!

जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो आपला संभाजी होता जय संभाजी!
संभाजी महाराजांना पुण्यतिथी निमित्त विन्रम अभिवादन!

मृत्यू लाही मात देईल
असा त्यांचा गनिमी कावा,
झुकले नाही डोळे त्यांचे
असा माझा शिवबाचा छावा होता.
संभाजी महाराजांना पुण्यतिथी निमित्त विन्रम अभिवादन!

शृंगार होता संस्कारांचा,
अंगार होता हिंदवी स्वराज्याचा,
शत्रूही नतमस्तक होई जिथे,
असा पुत्र होता आमच्या “छत्रपती शिवरायांचा”
संभाजी महाराजांना पुण्यतिथी निमित्त विन्रम अभिवादन!

संभाजी महाराजांनी 'बुधभूषण' हा संस्कृत ग्रंथ, तर 'नायिकाभेद', 'नखशीख' आणि 'सातसतक' हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले. लहानपणीच कवी कलश, महाकवी भूषण यांसारख्या विद्वानांच्या संपर्कात आल्याने त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला होता.