Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2024 HD Images: शूर शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांची आज जयंती. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केले. आजही त्यांच्या शौर्याच्या कहाण्या वाचायला, ऐकायला मिळतात. संभाजींना लहानपणापासूनच राजकारणाची जाण होती आणि त्यांनी अनेक प्रसंगी आपले कौशल्य दाखवले.
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी तत्कालीन महाराष्ट्रातील पुरंदर किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आणि आईचे नाव सईबाई होते. संभाजींच्या पत्नीचे नाव येसूबाई होते. त्यांच्या जन्मानंतर काही काळातच त्यांची आई सईबाई मरण पावली. यानंतर त्यांचे संगोपन त्यांची आजी जिजाबाईने केले. कालांतराने त्यांनी मराठी आणि संस्कृतसह इतर अनेक भाषांमध्ये प्रभुत्व संपादन केले. आज देशभरात संभाजी महाराजांची जयंती साजरी होतं आहे. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Messages, Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे तुम्ही शंभूराजांना त्रिवार अभिवादन करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या शौर्याला
त्रिवार प्रणाम व सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
1680 मध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांना गादीवर बसवण्यात आले. आपल्या 9 वर्षांच्या राजवटीत त्यांनी मुघल आणि पोर्तुगीज यांच्या विरोधात जोरदार लढा दिला.