Akshaya Tritiya 2025 Messages In Marathi 6 (फोटो सौजन्य - File Image)

Akshaya Tritiya 2025 Messages In Marathi: यंदा 30 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya 2025) सण साजरा करण्यात येणार आहे. पौराणिक कथांमध्ये या दिवसाबद्दल अनेक मनोरंजक घटनांचा उल्लेख आहे, ज्यामुळे हा दिवस आणखी खास बनतो. एका पौराणिक कथेनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली आणि भगवान विष्णूचा सहावा अवतार परशुराम यांचा जन्म झाला. आणखी एक आख्यायिका अशी आहे की, या दिवशी महाभारताचे लेखक महर्षी वेद व्यास यांनी भगवान गणेशाला महाकाव्य सांगण्यास सुरुवात केली.

याशिवाय, हा दिवस भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा बालपणीचा मित्र सुदामा यांच्या भेटीचा दिवस देखील आहे. तथापि, दुसऱ्या एका मान्यतेनुसार, अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. या सर्व घटना या दिवसाला विशेष आणि शुभ मानण्याचे कारण बनतात. या दिवशी लोक एकमेकांना अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील Wishes, Quotes, Greetings द्वारे अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा सोशल मीडियावर शेअर करून हा दिवस आनंदाने साजरा करू शकता.

माता लक्ष्मीचा हात असो,

सरस्वतीची साथ असो

गणपती बाप्पाचा वास असो

आणि माता दुर्गाचा आशीर्वाद असो..

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!

Akshaya Tritiya 2025 Messages In Marathi 1 (फोटो सौजन्य - File Image)

सुवर्ण क्षणांच्या आठवणी,

लक्ष्मी अक्षय्य तृतीयेच्या दिनी,

जीवनदीप जाई उजळुनी,

सुख, समृद्धी लाभो जीवनी,

भक्ती-प्रेमरस ओथंबुनी,

बंधुभाव वाढे जनगणमनी,

अक्षय्य तृतीयेच्या अक्षय्य शुभेच्छा..!

Akshaya Tritiya 2025 Messages In Marathi 2 (फोटो सौजन्य - File Image)

अक्षय राहो आरोग्य आपले

अक्षय राहो सुख आपले

अक्षय राहो नाते आपले

अक्षय राहो प्रेम आपले

आपणास व आपल्या परिवारास

अक्षय्य तृत्तीयेच्या खूप खूप शुभेच्छा..!

Akshaya Tritiya 2025 Messages In Marathi 3 (फोटो सौजन्य - File Image)

माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला सदैव सुख, समाधान, शांती, आरोग्य, समृद्धी लाभो हीच प्रार्थना..

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!

Akshaya Tritiya 2025 Messages In Marathi 4 (फोटो सौजन्य - File Image)

लक्ष्मी माता वरदान दिलं नाहीस जरी आम्हाला,

पण प्रेम मात्र नक्की दे,

तुझ्या चरणी जाओ पूर्ण आयुष्य…

फक्त तुझा आशिर्वाद दे,

तुमच्या परिवाराला,

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!

Akshaya Tritiya 2025 Messages In Marathi 4 (फोटो सौजन्य - File Image)

अक्षय्य तृतीयेला लोक एक दिवस उपवास करतात. या दिवशी, भक्त भगवान विष्णूला अक्षता अर्पण करतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान कुबेरची पूजा केली जाते. कारण, भगवान कुबेर यांना संपत्तीची देवता समजले जाते. अक्षय्य तृतीयेचा दिवस शुभ मानला जातो, म्हणून बरेच लोक या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करतात. याशिवाय या दिवशी दानधर्माचेही विशेष महत्त्व आहे.