Ganesh Visarjan Messages 2024

Ganpati Visarjan 2024 Messages: आज म्हणजेच 17 सप्टेंबरला बाप्पाला मोठ्या थाटामाटात निरोप दिला जाणार आहे. गणपतीच्या भक्तांसाठी हा दिवस खूप खास आहे. या दिवशी बाप्पाची आराधना केल्याने शुभ फळ मिळते, असे मानले जाते. गणेश विसर्जन (Ganesh Visarjan 2024) हा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 14 व्या दिवशी साजरा केला जातो, जो गणेश उत्सवाची समाप्ती देखील दर्शवितो.

त्याच वेळी, हा शुभ प्रसंग आणखी खास बनवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2024) स्लोगण, अनंत चतुर्दशी मराठी संदेश, अनंत चतुर्दशी संदेश, गणपती बाप्पा विसर्जन स्टेटस, गणपती विसर्जन कोट्स, गणपती विसर्जन मेसेज, गणपती विसर्जन शुभेच्छापत्र घेऊन आलो आहोत. तुम्ही हे शुभेच्छा संदेश तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करून त्यांचा दिवस भक्तिमय करू शकता. (हेही वाचा - Ganesh Visarjan 2024 Messages In Marathi: गणपती विसर्जनानिमित्त WhatsApp Status, Quotes, Greetings, Wishes, Images च्या माध्यमातून द्या बाप्पाला निरोप!)

आज सर्वत्र गणपती विसर्जनाची तयारी सुरू आहे. आज घरोघरी लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला जाईल. मुंबई, पुण्यात आज गणपती विसर्जनानिमित्त मोठ-मोठ्या मिरवणूका काढल्या जातात. त्यानंतर बाप्पाचे ढोल-ताशाच्या गजरात विसर्जन केले जाते.