No Panty Day 2021: आज साजरा केला जात आहे 'नो पॅंटी डे' ; जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्व
No Panty Day 2021 Date, History & Significance ( Photo Credit- File Image)

No Panty Day 2021:  पॅंटी न घालता राहणे ही एक स्वतंत्र भावना आहे! एक दिवस अंडरगारमेंट परिधान केले नाही अशी फक्त कल्पना करुन बघा.काही लोकांना हा विचार विचित्र वाटेल तर काही जण एक दिवसासाठी अंडरगार्मेंट न घालण्याच्या विचाराने आपला आनंद रोखू शकणार नाहीत. दरवर्षी 22 जून हा दिवस 'नो पँटी दिन' म्हणून साजरा केला जातो आणि नावाप्रमाणेच आपण हा दिवस पँटी न घालता साजरा करू शकता. याचा अर्थ असा की आपण पँटी न घालता केवळ जीन्स घालून घराबाहेर जाऊ शकता. (अंतर्वस्त्रे निवडताना घ्या अशी काळजी, नाहीतर 'प्रायव्हेट पार्टस'वर होईल हा परिणाम)

नॅशनल नो पँटी डे चा इतिहास आणि महत्व 

नॅशनल नो पँटी डे बद्दल बरेच सिद्धांत आहेत. हा दिवस कसा अस्तित्वात आला हे निश्चितपणे माहित नसले तरी तो 1980 च्या मध्यापासून सुरू झाला असल्याचे म्हटले जाते . स्त्रियांना स्वतंत्र वाटावे  ही या दिवसामागील कल्पना आहे. असे म्हटले जाते की, पँटी 12 व्या शतकात पहिल्यांदा पाहिली गेली, परंतु 14 व्या शतकापर्यंत कपड्यांखाली अंडरगारमेंट न घालणे ही चांगली गोष्ट मानली जात असे.

18 व्या शतकात पँटी नी लोकप्रियता मिळविली आणि हळूहळू भरतकाम, लेस, फ्रिल्स यांसह पँटी विकसित झाली आणि त्यानंतर एक दिवस पँटी येण्याआधी असलेल्या वेळेला समर्पित केला गेला. काही लोकांचा असा विश्वास आहे की, हे असे एक आव्हान होते जेथे लोक अंडरगारमेंट्स घालण्याची हिम्मत करीत नाहीत आणि सार्वजनिक ठिकाणी बाहेर पडणार नाहीत.

तथापि, आजच्या जगात याचे उद्दीष्ट महिलांचे स्वातंत्र्य आणि त्यांच्या आवडीचे कपडे घालण्याचे आहे. यासाठी सक्तीच्या सहभागाची आवश्यकता नाही परंतु हा दिवस महिला आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा आहे.