New Years Eve| Photo Credits: Google

New Year's Eve 2019 Google Doodle: गूगल  या लोकप्रिय सर्च इंजिनने आज 2019 ला अलविदा म्हणत 2020 चं स्वागत करण्यासाठी खास गूगल डुडल बनवलं आहे. दरम्यान 'नवीन वर्षाची संध्याकाळ' (New Year's Eve) या थीमवर साकरण्यात आलेल्या गूगल डुडलवर कार्टून स्वरूपातील बेडूक नववर्षाच्या सेलिब्रेशनची आतषबाजी पाहत आहे. 2020 हे आगामी वर्ष लीप इयर असल्याने या नव्या वर्षाची अनेकांमध्ये उत्सुकता आहे. Happy New Year 2020 Messages: नववर्षाच्या शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, WhatsApp Stickers च्या माध्यमातून शेअर करून प्रियजनांना द्या आगामी नव्या वर्षाच्या शुभेच्छा!

ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार, 31 डिसेंबर हा नववर्षातील शेवटचा दिवस आहे. 1 जानेवारी पासून नव्या वर्षाची सुरूवात होते. दरम्यान नववर्षाच्या स्वागतासाठी जगभरात 31 डिसेंबरच्या रात्री सेलिब्रेशनचे प्लॅन्स असतात. अनेकजण मित्रपरिवार, प्रियजनांसोबत 31 डिसेंबरच्या रात्री बाहेर फिरायला जातात. ठीक 12 च्या ठोक्याला सुरू होणार्‍या नव्या वर्षाचे साक्षीदार होतात. दरम्यान या क्षणाच्या वेळेस जगभरात अनेक ठिकाणी आकर्षक आताषबाजी केली जाते. सिडनी, ऑस्ट्रेलिया, दुबई सह जगभरात खास रोषणाई डोळे दिपणारी आहे.

दर चार वर्षांनी लीप वर्ष येते. यंदा सुरू होणारं 2020 हे वर्ष लीप वर्ष आहे. लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29 दिवसांचा महिना महिना असतो. त्या या नव्या वर्षाचं सेलिब्रेशन इतर सणांइतकंच खास असतं. जगभरातील लोक नववर्षाच्या पहिल्या दिवशी प्रार्थनास्थळाला भेट देऊन नव्या वर्षात सुख, शांती, सौख्यासाठी प्रार्थना करतात.