आज सकाळी महाराष्ट्रासह देशभरात देवीची प्रतिष्ठापना आणि घटस्थापना झाली आहे. आता सकाळी मंगलमय वातावरणात देवीची पूजा झाल्यानंतर रात्री तरूणाईसह आबालवृद्ध गरबा आणि रास लील्याच्या तालावर थिरकायला सज्ज झाला आहे. यंदा नवरात्रीचा पहिलाच दिवस रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आल्याने अनेकजण आज गरबा नाईट्समध्ये (Garba Nights) सहभागी होणार आहेत. पारंपारिक गाण्यांसोबतच बॉलिवूडच्या काही हिंदी गाण्यांसोबत हे समिकरण जोडलेले आहे. त्यामुळे यंदा तुम्ही गरब्यासाठी सज्ज होत असाल तर तुमच्या मंडळाच्या, सोसायटीमधील गरबा नाईट्समध्ये ही एव्हरग्रीन तुम्हांला नक्की ऐकायला मिळतील.
गरबा, दांडिया, टिपर्या आणि रास हे पारंपारिक नृत्य प्रकार आहेत. महाराष्ट्राबाहेरील हे नृत्यप्रकार आता अनेक मेट्रो पोलिटन सिटीजमध्ये खेळताना दिसतात. नवरात्रीच्या काही दिवस आधी अनेकजण यासाठी खास प्रशिक्षण देखील घेतात. Navratri 2019: रासगरबा आणि दांडिया खेळण्यासाठी मुंबईत 'ही' ठिकाणे ठरतात पहिली पसंती; यंदाची तारीख, वेळ आणि तिकिटांचे दर जाणून घ्या
'परी हू मैं'
ढोली तारो
कमरिया
चोगाडा
मुंबईमध्ये बोरिवली, वरळी, गोरेगाव, ठाणे अशा ठिकाणी मोठ्या मैदानावर भव्य स्वरूपात दांडिया नाईट्सचे आयोजन केले जाते.