Navratri 2022 Rangoli Designs: नवरात्रीच्या उत्सवात काढा येतील अशा सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन, पाहा व्हिडीओ
Navratri 2022 Rangoli Designs

Navratri 2022 Rangoli Designs: गणेशोत्सवाचा सण जल्लोषात साजरा केल्यानंतर सर्वांना नवरात्री सणाची उत्सुकता लागली आहे. हिंदू धर्मात नवरात्रीचा सण खूप महत्वाचा मानला जातो. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये देवीच्या नऊ रूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. अनेकांकडे घट बसवले जातात आणि सकाळ संध्याकाळ भक्तिभावाने पूजा केली जाते. सण म्हणजे पावित्र्य आणि आनंद, प्रत्येक सण अतिशय भक्तिभावाने आणि आनंदात साजरा करण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे वेगळे महत्व आहे, परंतु प्रत्येक सण साजरा केल्यानंतर मिळणारा आनंद सारखा आहे. दरम्यान, नवरात्रीसाठीची लगबग सुरु झाली असेल. नवरात्री सण साजरा करण्यासाठी घराची सजावट करण्यात महिला वर्ग व्यस्त असेल, अशात नवरात्री निमित्त प्रत्येक दिवशी रांगोळी काढली जाते, हिंदू धर्मात रांगोळीचे खूप महत्व आहे. प्रत्येक शुभ प्रसंगी रांगोळी काढण्याची पद्धत आहे. आम्ही नवरात्री सणानिमित काढता येतील अशा सुंदर रांगोळी डिझाईनचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत, [पाहा हे देखील वाचा: Navratri 2022 Mehndi Designs: नवरात्रीसाठी काही सुंदर मेहंदी डिझाईन, झटपट होईल काढून, पाहा व्हिडीओ]

पाहा व्हिडीओ: 

नवरात्री रांगोळी डिझाईन्स

नवरात्री रांगोळी डिझाईन्स

नवरात्री रांगोळी डिझाईन्स

नवरात्री रांगोळी डिझाईन्स

नवरात्री रांगोळी डिझाईन्स

तेव्हा यंदा नवरात्रीचे ९ दिवस सुंदर आणि आकर्षक रांगोळी काढा आणि नवरात्रीचा पवित्र सण उत्साहात साजरा करा, दारापुढे देवाची रांगोळी काढतांना रांगोळीवर कोणाचा पाय पडणार नाही  याची दक्षता घ्यावी, व्हिडीओमध्ये काढलेल्या सुंदर रांगोळी डिझाईन तुमच्या घराची शोभा आणखी वाढवतील, नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!