Navratri 2020 4th Day Saree Colour: शारदीय नवरात्रीच्या चौथ्या दिवशी लाल रंग; स्टायलिश लूक साठी पहा साडी, ड्रेस आणि इंडो वेस्टर्न लूकच्या आयडिया!
Navratri Day 4 Red Colour | Photo Credits: Instagram

Navratri 2020 4th Day Red Colour: शारदीय नवरात्री मध्ये यंदा कोरोना संकटामुळे जल्लोष, धामधूम कमी असली तरीही नवरात्रीचे नऊ रंग आणि त्याचं सेलिब्रेशन मोठ्या दणक्यात सुरू आहे. मागील 6-7 महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम मुळे थोड्या सुस्तावलेल्या तुमच्या क्रिएटीव्हिटीला थोडी चालना द्या. घरात राहून देखील तुम्ही यंदा नवरात्रीचे नऊ रंग फॉलो करत असाल तर आजचा चौथ्या दिवसाचा रंग लाल आहे. व्हर्च्युअल सेलिब्रेशन किंवा अगदी बाहेर पडणार असाल तर लाल रंगाचा फेसमास्क घालून तुम्ही नवरात्री 2020 नऊ रंग (Navratri Nine Colours) सेलिब्रेट करू शकता. तसेच कामानिमित्त बाहेर पडत असालच तर ड्रेस, साडी किंवा नवरात्री दरम्यान इंडो वेस्टर्न लूक मध्येही तुम्ही लाल रंग (Red Colour) अगदी ग्रेस फुली परिधान करू शकता. महाराष्ट्राच्या परंपारिक खणापासून ते अगदी नॉर्मल साडीमध्ये लाल रंग हा सार्‍यांवर खुलून दिसणार्‍या एका रंगापैकी आहे. त्यामुळे तुम्ही आज लाल रंगामध्ये सजणार असाल तर पहा काही ट्रेंडी सेलिब्रिटींच्या लूक आयडिया. Navratri Colours 2020 Full Schedule: शारदीय नवरात्री नऊरंगांचं मराठी वेळापत्रक तारखेनुसार इथे पहा आणि मोफत डाऊनलोड करा PDF स्वरूपात!

नवरात्रीच्या नऊ दिवसांमधील आज (20 ऑक्टोबर) चौथ्या माळेला लाल रंग आहे. प्रामुख्याने बंगाल, गुजरात आणि उत्तर भारतातील संस्कृती पाहिली तर त्यांच्याकडे लाल रंग महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये हमखास वापरला जातो. पण आपणही काही मिक्स अ‍ॅन्ड मॅच करत लाल रंग अधिक खुलवू शकतो. यामध्ये लाल रंगांच्या तुमच्या आवडीनुसार शेड्स कमी जास्त केल्या जाऊ शकतात.

लाल रंगामध्ये सेलिब्रिटींचे लूक

मंजिरी ओक

 

View this post on Instagram

 

ती: का पाहतो आहेस असा? माझी मी मलाच सापडेना.. तो: नजर तुझ्यावरची काही केल्या हटेना.. कसे सुचते तुला?? अगं खणावरील या मुद्रा डोळ्यांआड जाईना.. नित्यश्री ज्ञानलक्ष्मी... Saree n kurta by: @k2fashioncloset Style by: @ketaki_ashish Photography: @vikrantmumbaikar MUA: @madhurikhese_makeupartist Hair style : @komalpashankar_makeupartist Jwellery: @candies_collection Graphics: @imprachi.official Poem: @nityashree19 Cam assit : @love_u_zindagi_000 Video: @rohitkrishnanaik

A post shared by manjiri oak (@manjiri_oak) on

 

प्रिया बापट

सोनाली कुलकर्णी

 

View this post on Instagram

 

पोरी इथे येतील भारी 🙅🏻‍♀️ वजनदार आहे प्रत्येक नारी 👧🏻 घालतील पैंट नेसतील सारी.....👖🥻 मोहक अदा नज़र करारी 👁 डान्स शी पंगा 🕺🏻 नृत्याचा दंगा ✊🏻 उडतील खास घेतील भरारी 🧚🏻‍♀️ - ✍🏻 @kulkarnic #dancingqueen 💃🏻👸🏻👑 आज रात्री ९.३० वाजता @zeemarathiofficial वर Jute blazer and skirt by @moresha_sameera_dalvi And proudly associating with @kranti_redkar ‘s brand @krakarofficial wearing this lovely 🌟SONDER🌟 neck piece 📸 by @pranitkumbhar12345 #sonaleekulkarni

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

मिताली मयेकर

उद्या नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. शारदीय नवरात्रीमधील पाचवा दिवस हा अनेक ठिकाणी ललित पंचमी म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने अनेक ठिकाणी देवीची ओटी भरली जाते. तर उद्या 21 ऑक्टोबरला निळा रंग आहे.

भारतामध्ये नवरात्री साजरी करण्याची प्रथा परंपरा वेगवेगळी असली तरीही सारख्याच रंगाचे कपडे घालण्याच्या नव्या ट्रेंडमुळे आता नवरात्रीचे नऊ दिवस धम्माल होऊन जातात.