Youth Day | File Image

भारतामध्ये 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती (Swami Vivekanand Jayanti) म्हणून 'राष्ट्रीय युवा दिवस' (National Youth Day) म्हणून साजरा केला जातो. आज भारताचं सामर्थ्यचं आपली सर्वाधिक युवा लोकसंख्या आहे. त्यामुळे देशातील तरूणाईला सकारात्मकतेने जीवनाकडे पाहत पुढे जाण्याचा सल्ला देताना आज तुम्ही त्यांना सोशल मीडीयात Facebook Messages, WhatsApp Status, Instagram Reels च्या माध्यमातून काही प्रेरणादायी विचार पाठवून त्यांना युवा दिनाच्या शुभेच्छा देऊ शकाल. राष्ट्रीय युवा दिन हा यंंदा ''It's All In The Mind” या थीमवर साजरा केला जाणार आहे.

आजची तरूण पिढी जीवघेण्या स्पर्धेच्या युगात गुरफटली आहे. त्यामधूनच सुरूवातीला न्यूनगंड निर्णय होणं पुढे नैराश्याचं जाळं आणि त्यामधून आत्महत्येसारखी टोकाची पावलं सहज उचलली जात आहे. पण तुमचा माईंडसेट सकारात्मक असेल तर त्यामधून केले जाणारे प्रयत्न आणि हाती येणारे यश देखील तितकच खास असणार  आहे. त्यामुळे सारे मनाचे खेळ घडवण्यासाठी ती सकारात्मकता या विचारांमधून तुमच्या प्रियजणांसोबत पोहचवा.

तरूणांसोबत शेअर करण्यासाठी सकारात्मक विचार 

Youth Day | File Image

खेळ’ असो वा ‘आयुष्य’आपलं सामर्थ्य

तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा

आपल्याला “कमजोर” समजत असेल.

Youth Day | File Image

शुन्यालाही देता येते किंमत,

फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.

Youth Day | File Image

चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा

योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.

Youth Day | File Image

असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते,

दुसऱ्याच्या आधाराशिवाय

ते कधीच उभे राहू शकत नाही.

Youth Day | File Image

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..

आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

1984 साली भारत सरकार कडून पहिल्यांदा 12 जानेवारी स्वामी विवेकानंदांची जयंती ही 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरी करण्याची घोषणा झाली आहे. या दिवसाच्या माध्यमातून स्वामीजींचे विचार, कृतींचा आदर्श तरूणांनी घ्यावा यासाठी प्रयत्न केले जातात.