![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/10/1-राष्ट्रीय-एकता-दिवसाच्या-शुभेच्छा-380x214.jpg)
National Unity Day 2021 Images: भारतात विविध धर्म, जाति आणि संप्रदायाचे लोक राहतात. येथे अनेक प्रकारच्या भाषा सुद्धा बोलल्या जातात. त्यामुळे विविधतेने नटलेल्या भारतात एकतेचा संदेश हा कायम दिला जातो. आपल्या देशात अनेकतेव्यतिरिक्त जरी एकता दिसून येत असली तरीही त्याचे श्रेय पोलादी पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांना जाते. कारम भारताला एकत्रित बनवण्याचे काम पटेल यांनी केले आहे. याच पार्श्वभुमीवर सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती येत्या 31 ऑक्टोंबरला साजरी केली जाणार आहे. दरम्यान, 2014 मध्ये भारत सरकारने प्रत्येक वर्षी 31 ऑक्टोंबरला राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जाणार असल्याचे जाहीर केले होते.
राष्ट्रीय एकता दिनामिमित्त सरदार पटेल यांनी देशासाठी केलेल्या महान कार्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. तर सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती आणि राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त Messages, Wishes, WhatsApp Status, Facebook Post शेअर करत मित्रपरिवाराला द्या शुभेच्छा!
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/10/3-राष्ट्रीय-एकता-दिवसाच्या-शुभेच्छा.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/10/1-राष्ट्रीय-एकता-दिवसाच्या-शुभेच्छा.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/10/2-सरदार-वल्लभ-भाई-पटेल-यांना-जयंती-निमित्त-विनम्र-अभिवादन.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/10/1-सरदार-वल्लभ-भाई-पटेल-यांना-जयंती-निमित्त-विनम्र-अभिवादन.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/10/3-सरदार-वल्लभ-भाई-पटेल-यांना-जयंती-निमित्त-विनम्र-अभिवादन.jpg)
सरदार वल्लभ भाई पटेल यांचे योगदान आणि राष्ट्रीय एकता दिनानिमित्त जागृकता पसरवण्यासाठी प्रत्येक वर्षी 31 ऑक्टोंबरला राजधानी दिल्लीसह विविध ठिकाणी 'रन फॉर युनिटी' नावाने मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. तर 31 ऑक्टोंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या 182 मीटर उंचीच्या प्रतिमेचे अनावरण केले होते. त्याला 'स्टॅच्यु ऑफ युनिटी' असे संबोधले जाते.