National Milk Day 2020 : राष्ट्रीय दूध दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊयात दुधाचे आरोग्यासाठी होणारे महत्वाचे फायदे 
Photo Credit : Unsplash

राष्ट्रीय दूध दिन (National Milk Day) दरवर्षी 26 नोव्हेंबरला देशभरात साजरा केला जातो.हा दिवस भारतातील श्वेत क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांच्या वाढदिवसाच्या दिवशी साजरा केला जातो.दुधाला आपल्या सर्वांच्या आयुष्यात खुप महत्वाचे स्थान आहे.तान्ह बाळ असो वा कुणी वृद्ध व्यक्ती या सर्वांच्याच आरोग्यासाठी दूध आवश्यक आहे.आज राष्ट्रीय दूध दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊयात दुधाचे आपल्या आरोग्यासाठी होणारे फायदे. (Mahatma Jyotiba Phule Death Anniversary : महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथि निमित्त जाणून घेऊयात त्यांचे 10 प्रेरणादायी विचार )

दुधामध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्व 'ड', फॉस्फरस, मॅग्नेशियम यांसारखे घटक असतात. हे सर्व घटक हाडे मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

एका संशोधनाच्या अनुसार दुध पायल्याने हाडांमध्ये फ्रॅक्चर होण्याची शक्यता सुद्धा खूप कमी असते.

सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे दुध जास्त प्यायल्याने दात अतिशय मजबूत होतात

थंड दूधात इलेक्ट्रोलाईट्स असतात. त्यामुळे डिहाड्रेशनपासून बचाव होतो.

दिवसातून दोनदा थंड दूध प्यायल्यास तुम्ही नेहमी हाडड्रेट रहाल. दूध पिण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे सकाळची.

थंड दूधामुळे गॅस होत नाही. अन्नपचनास मदत होते. यामुळे फॅट्स, तूप आणि तेल याचे चांगले पचन होते.

दूध हे त्वचेस कोमल बनवते सोबतच मुलायम आणि चमकदार हि बनवते.

अध्ययनाने हे सिद्ध झाले आहे कि ज्या महिला रोज दूध पितात त्याचे वजन हे दूध न पिणाऱ्या महिलांच्या तुलनेत कमी असते.

जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर दूधामध्ये तूप टाकून प्यावं. त्यात ब्यूट्रिक अॅसिड असतं ते आपल्या शरीरातील पचनासाठी असलेले एंझाईम्स वाढवतो.

90 च्या दशकात भारतीय दूध उत्पादनाच्या बाजाराने स्वत: साठी स्थान निर्माण केले आणि जागतिक पातळीवर या व्यवसायाला चालना दिली. डॉ कुरियन यांच्या कष्टानेच त्यांनी दुधाच्या उत्पादनात भारताला एक नवीन ओळख दिली. ज्यामुळे आज भारत जगभर दुधाचा पुरवठा करीत आहे. इंडियन डेअरी असोसिएशनने डॉ. कुरियन यांचा वाढदिवसाच्या दिवशी 2014 मध्ये राष्ट्रीय दूध दिन म्हणून घोषित केला.