
National Girl Child Day 2022 Images: दरवर्षी 24 जानेवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय बालिका दिन (National Girl Child Day) म्हणून साजरा केला जातो. आज देशातील मुलींचा जवळपास प्रत्येक क्षेत्रात वाटा आहे. पण एक काळ असा होता की, लोक मुलींची भ्रणहत्या करत असतं. मुली जन्माला आल्यावरही त्यांना बालविवाहाच्या आगीत ढकलले गेले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत सरकार मुलगी आणि मुलगा यांच्यातील भेदभावाविरोधात, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात झटत आहे. मुलींना देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी अनेक योजना आणि कायदे राबवण्यात आले. या उद्देशाने राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. 24 जानेवारीला हा खास दिवस साजरा करण्यामागे एक खास कारण देखील आहे. हे कारण भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी संबंधित आहे.
राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त Wishes, Messages, Images, ग्रिटींग्स तुम्ही सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटरवरुन शेअर करु शकता. खालील ईमेजस वापरून तुम्ही हा दिवस आणखी खास करू शकता. (वाचा - Happy National Girl Child Day 2022 Wishes: राष्ट्रीय बालिका दिवसाच्या शुभेच्छा Facebook Messages, Quotes द्वारा देत साजरा करा मुलीचा जन्म!)
मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी.
राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!

भारताचे उज्ज्वल भविष्य घडवणार्या
सर्व ‘कन्यांना’ राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!

लेक वाचवा, लेक वाढवा, लेक घडवा.
राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!

मुलीला समजू नका भार
तिच आहे तुमच्या जीवानाचा आधार
राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा!

राष्ट्रीय बालिका दिवसाच्या शुभेच्छा !

राष्ट्रीय बालिका दिन दरवर्षी 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस 2009 पासून साजरा करण्यास सुरुवात झाली. महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 24 जानेवारी 2009 रोजी देशात प्रथमच राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला.