Mumbai: इस्लामिक कॅलेंडर मधील मोहरम हा पहिलाच महिना असतो. त्याला हिजरी कॅलेंडर असे ही संबोधले जाते. मोहरम सुरु होताच इस्लामिक नवं वर्षाला सुरुवात होते. आशुरा हे मोहरम महिन्याच्या 10 व्या दिवशी येणार आहे. तर मोहरम 2021 आणि आशुराची तारीख ही भारतात चंद्र दिसल्यानंतर ठरवली जाणार आहे. ऑगस्ट महिन्यात भारतातील मुस्लिम बांधव मोहरम साजरा करणार आहेत. तर जाणून घ्या आशुरा आणि मोहरम कधी पासून सुरु होणार आहे.
इस्लामिक कॅलेंडरचे महिने हे चंद्राच्या चक्राप्रमाणे बदलले जातात. जर चंद्र 29 व्या दिवशी दिसला तर त्याच दिवसापासून इस्लामिक नवं महिन्याची सुरुवात होते. अन्यथा 29 व्या दिवशी चंद्राचे दर्शन न झाल्यास त्या महिन्याचे 30 दिवस पूर्ण केले जातात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सुरुवात केली जाते.
भारतात मोहरम कधी साजरा केला जाणार?
भारतात इस्लामिक कॅलेंडर मधील अखेरचा महिना म्हणजे Dhul Qadah हा 29 व्या दिवशी (9 ऑगस्ट) रोजी आहे. त्यामुळे जर 9 ऑगस्ट रोजी चंद्र दिसला तर 10 ऑगस्ट पासून मोहरमचा महिना सुरु होणार आहे. मात्र 29 व्या दिवशी दिसलाच नाही तर 30 दिवस पूर्ण करत 11 ऑगस्टला मोहरमचा महिना सुरु होईल. चंद्र दिसण्यावर मोहरमचा महिना हा 10 ऑगस्ट किंवा 11 ऑगस्ट दरम्यान सुरु होऊ शकतो.
भारतात आशुरा कधी?
जर भारतात मोहरम 10 ऑगस्ट पासून सुरु झाल्यास, आशुरा 19 ऑगस्ट रोजी असणार आहे. तसेच 11 ऑगस्ट पासून जर मोहरमचा महिना सुरु झाल्यास आशुरा 20 ऑगस्ट रोजी येणार आहे. आशुरा हा दिवस आहे जेव्हा पैगंबर मोहम्मद यांचे नातू हुसेन आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य करबलामध्ये शहीद झाले.