
Mothers Day Messages 2023: आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे आपली आई. ‘आई’ हा शब्दच आस आहे ज्याची महती शब्दांत व्यक्त करणे अवघड आहे. फ.मुं.शिंदे म्हणतात, ‘आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं एक गांव असतं, आई असते जन्माची शिदोरी... सरतही नाही अन् उरतही नाही.’ तर अशा या आपल्या आईच्या त्यागाचा, प्रेमाचा, कष्टाचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे मातृदिन म्हणजेच मदर्स डे (Mother's Day 2023). दरवर्षी मे महिन्यातील दुसरा रविवार हा जागतिक मातृदिन म्हणून साजरा केला जातो. यंदा 14 मे रोजी हा दिवस साजरा केला जाईल.
आईबद्द्लचे तुमचे प्रेम आणि कृतज्ञता दर्शविण्यासाठी मातृदिन हा योग्य दिवस आहे. या दिवशी आपल्या आईला तिच्या आवडीची एखादी गोष्ट किंवा गिफ्ट देऊन तुम्ही हा दिवस साजरा करू शकता. यासोबतच काही खास Images, Whatsapp Status, Wishes, Quotes, Greetings, Messages शेअर करून तुम्ही तुमच्या आईला किंवा तुमच्या जीवनातील आईसमान व्यक्तीला मातृदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता.






दरम्यान, प्राचीन काळी ग्रीक आणि रोमन आईला मातृदेवता मानून पूजा करायचे असे म्हटले जाते. युकेमध्ये देखील मदरिंग संडे नावाने एक साजरा होत होता. परंतु सध्याच्या ‘मदर्स डे’ची सुरुवात ही अमेरिकेमधून झाली. मदर्स डेच्या संस्थापिका अण्णा जार्विस यांनी माता आणि मातृत्वाच्या सन्मानार्थ मातृदिन साजरा करण्याची कल्पना सुचविली होती. यासाठी अनेक जणांनी पुढाकार घेऊन एक चळवळ उभी केली व 1914 मध्ये तिला राष्ट्रीय मान्यता मिळविण्यात यश आले. (हेही वाचा: यंदा 14 मे रोजी साजरा होणार 'मदर्स डे'; जाणून घ्या 'मातृदिना'चे महत्व व या दिवसाच्या सेलिब्रेशनचा इतिहास)
9 मे 1914 रोजी अमेरिकी प्रेसिडेंट वुड्रो विल्सन यांनी एक कायदा पारित केला होता, ज्यानुसार मे महिन्याच्या दुसर्या रविवारी मातृ दिवस साजरा करण्यात येईल असे सांगितले गेले. त्यानंतर जगभरातील अनेक देशांमध्येही हा दिवस साजरा होऊ लागला.