10 जुलै हा दिवस मातृ सुरक्षा दिन (Matru Suraksha Din) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने आईपण जगणार्या, अनुभवणार्या सार्याच महिलांमध्ये गरोदरपणाच्या काळातील सुरक्षेबददल जनजागृती निर्माण करण्यासाठी या दिवसाचं महत्त्व आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून 2005 सालपासून हा दिवस सेलिब्रेट करण्याला सुरूवात झाली आहे. Maternal Health बाबत सजगता निर्माण करण्यासाठी या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. गरोदरपणा आणि बाळाच्या जन्मानंतरही महिलांनी पुरेशी काळजी न घेतल्याने Maternal Mortality Rate वाढतो. आजही स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे दुय्यम लक्ष देत असल्याने त्यांच्या गर्भारपणातील किंवा त्याच्याशी निगडीत मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे. मग आजच्या या मातृ सुरक्षा दिनाच्या निमित्ताने तुमच्या आयुष्यातील त्या प्रत्येक स्त्री पर्यंत या सजगतेबद्दल जाणीव करून देण्यासाठी लेटेस्टली कडून बनवण्यात आलेले हे Quotes, Greetings, Wishes, Messages, Photos आज Facebook, WhatsApp, Twitter, Instagram द्वारा शेअर करत या दिवसाचं सेलिब्रेशन करायला विसरू नका.
बाळंतपण म्हणजे बाईचा दुसराच जन्म समजला जातो. या कठीण पण तितक्याच आनंद देणार्या स्त्रियांच्या आयुष्यातील काळात त्यांना स्वतःची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आज 21 वी व्या शतकामध्ये अनेक महिला घर, संसार आणि करियर अशा विविध आव्हानांचा एकाच वेळी सामना करत असतात. त्यामुळे आता आरोग्याची काळजी घेण्याचं आव्हान अधिकच वाढलं आहे. ताण तणाव, नैराश्य यांचा स्त्रियांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे हे बदलत्या जीवनशैलीत जीवावर बेतण्याआधीच आपण स्वतः सांभाळणं गरजेचे आहे. नक्की वाचा: दरवर्षी 10 जुलै ला का साजरा केला जातो मातृ सुरक्षा दिवस? कधी आणि कशी झाली याची सुरुवात जाणून घ्या.
मातृसुरक्षा दिनाच्या शुभेच्छा
भारतामध्ये मदर्स डे वेगवेगळ्या दिवशी साजरा करण्याची प्रथा आहे. हिंदू संस्कृतीनुसार, पिठोरी अमावस्या दिवशी मातृदिन साजरा करण्याची प्रथा आहे. तर जागतिक स्तरावर मे महिन्याच्या दुसर्या रविवारी 'मदर्स डे' साजरा केला जातो. पण हे मदर्स डे चं सेलिब्रेशन आयुष्यभर करता यावा म्हणून प्रत्येकीला तिच्या गरोदरपणाच्या काळात काळजी घेणं आवश्यक आहे.