दरवर्षी 30 जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. हा दिवस शहीद दिन (Martyrs' Day 2020) म्हणूनही ओळखला जातो. यंदा महात्मा गांधी यांची 72 वी पुण्यतिथी साजरी केली जात आहे. गांधीजी नेहमीच अहिंसेच्या चळवळीसह देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करत राहिले. परंतु 30 जानेवारी, 1948 रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली आणि म्हणूनच या दिवसाला शहीद दिन म्हणून घोषित केले गेले.
दरवर्षी 30 जानेवारी आणि 23 मार्च रोजी शहीद दिवस पाळला जातो. पण याखेरीज 21 ऑक्टोबर आणि 17 नोव्हेंबरलादेखील शहीद दिन पाळला जातो.
या दिवशी देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली जाते. त्यांच्या शौर्याचे पोवाडे गायले जातात. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लोकांनी प्राणांची आहुती दिली, त्यांच्या त्यागाला सलाम करण्याचा आजचा दिवस. तर या दिवसाचे औचित्य साधून, आम्ही घेऊन आलो आहोत काही शूरवीरांचे विचार, जे तुम्ही तुमचे मित्र, कुटुंबीय किंवा जवळच्या लोकांना WhatsApp Messages, Images च्या माध्यमातून पाठवून जागवू शकता शहिदांच्या त्यागाच्या आठवणी.
(हेही वाचा: 30 जानेवारी हा दिवस शहीद दिन म्हणून का साजरा केला जातो? जाणून घ्या यामागचे कारण)
दरम्यान, आजच्या दिवशी राजघाट येथील महात्माजींच्या समाधीवर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि तिन्ही सेवा प्रमुख श्रद्धांजली वाहतात. त्याच वेळी सैन्य महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्यांच्या सन्मानार्थ आपली शस्त्रे खाली ठेवतात. यानिमित्ताने देशभरात महात्मा गांधी आणि इतर शहीदांच्या स्मृतीस वंदन म्हणून दोन मिनिटांचे मौन बाळगले जाते. 23 मार्च रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली, म्हणून 23 मार्च रोजीदेखील शहीद दिन देखील पाळला जातो.