Marathi Rajbhasha Din 2020: सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, सिद्धार्थ जाधव, प्रसाद ओक, रवि जाधव आदी मराठमोळ्या कलाकारांनी दिल्या 'मराठी राजभाषा दिना'च्या शुभेच्छा!
मराठी कलाकारांनी दिल्या 'मराठी राजभाषा दिना'च्या शुभेच्छा! (PC - Instagram)

Marathi Rajbhasha Diwas 2020: आज संपूर्ण महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन साजरा होत आहे. कवी कुसुमाग्रज (Kusumagraj) म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर (Vishnu Vaman Shirvadkar) यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात 'मराठी राजभाषा दिवस' म्हणून साजरा केला जातो. आजच्या या दिवसाचं औचित्य साधून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं.

आज जगभरातील विविध प्रदेशात विखुरलेली मराठी माणसं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून एकमेकांना 'मराठी राजभाषा दिना'च्या शुभेच्छा देत आहेत. या दिवसाच्या निमित्ताने सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, सिद्धार्थ जाधव, प्रसाद ओक, रवी जाधव आदी मराठमोळ्या कलाकारांनी मराठी बांधवांना 'मराठी राजभाषा दिना'च्या शुभेच्छा दिल्या आहेत. (हेही वाचा - Marathi Bhasha Din 2020: राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गजांकडून मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा!)

सोनाली कुलकर्णी ट्विट -

 

स्पृहा जोशी ट्विट - 

रवी जाधव ट्विट - 

प्रसाद ओक ट्विट - 

मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या कवितेतून मराठी भाषेचा प्रसार केला. कुसुमाग्रज यांचे मराठी भाषेसंदर्भातील कार्य लक्षात घेता त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. मराठी साहित्यात कुसुमाग्रज यांचं मोठं योगदान आहे. मराठी भाषेचा वारसा पुढे चालत राहावा यासाठी 27 फेब्रुवारी हा दिवस कुसुमाग्रजांचा जन्मदिवस ‘मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.