
Marathi Bhasha Gaurav Din 2024 Quotes in Marathi: मराठी भाषेला (Marathi Language) हजारो वर्षांची समृद्ध, गौरवशाली परंपरा आहे. मराठी ही जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या पहिल्या दहा भाषांपैकी आहे. महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी त्यांच्या साहित्यकृतींतून मराठी भाषा समृद्ध केली. अशा या मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज (Kusumagraj) तथा वि.वा.शिरवाडकर यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ (Marathi Bhasha Gaurav Din 2024) म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांचे मराठी साहित्यातील योगदान आणि भाषेच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांचे स्मरण म्हणून, 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून घोषित करण्यात आला.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत सावता माळी, संत नरहरी सोनार यांच्यासारख्या संतांनी त्यांचे अलौकिक विचार मराठी भाषेत मांडले. गाव-खेड्यातल्या बोलीभाषांनी मराठीचे सौंदर्य अधिक वाढवले. आज बारा कोटी लोक मराठी भाषा बोलतात. सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून मराठी देशात तिसऱ्या आणि जगात दहाव्या क्रमांकावर आहे.
गेल्या काही वर्षांत, मराठी भाषा गौरव दिन हा केवळ कुसुमाग्रजांचाच नव्हे तर मराठी साहित्य आणि भाषेतील इतर दिग्गजांचा सन्मान करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून विकसित झाला आहे. तर ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीचे निमित्त साधत WhatsApp Status, Quotes, Wishes, Messages च्या माध्यमातून द्या ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा.






दरम्यान, कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी नाशिक येथे झाला. कुसुमाग्रज हे मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजवणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि समीक्षक होते. त्यांना कुसुम नावाची एक लहान बहीण होती, एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून 'कुसुमाग्रज' असे नाव त्यांनी धारण केले. (हेही वाचा: Marathi Bhasha Gaurav Din 2024 Messages: 'कुसुमाग्रज' यांच्या जयंतीनिमित्त खास Images, WhatsApp Status, Wishes च्या माध्यमातून द्या ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा)
सामाजिक अन्याय व विषमता या विषयांवर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लिखाणातून कठोर टीका केली. ‘साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे’, या मताचा त्यांनी पुरस्कार केला. कविता, नाटक, कादंबरी, कथा, लघुनिबंध इत्यादी साहित्यप्रकारांमध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली.