![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/02/Marathi-Rajbhasha-Din-2024-Messages-6-380x214.jpg)
Marathi Bhasha Gaurav Din 2024 Messages in Marathi: आपल्या काव्यप्रतिभेने मराठी भाषेचा गौरव वाढविणारे, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते साहित्यिक कविवर्य तात्यासाहेब शिरवाडकर तथा ‘कुसुमाग्रज’ (Kusumagraj) यांच्या जयंतीनिमित्त 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ (Marathi Bhasha Gaurav Din 2024) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून राज्यात अनेक उपक्रम आणि कार्यक्रम राबवले जातात.
कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान आहे. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार म्हणून त्यांची ख्याती आहे. ‘कुसुमाग्रज’ या नावाने त्यांनी काव्य लेखन केले. प्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर यांच्या नंतर मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे कुसुमाग्रज दुसरे मराठी साहित्यिक होते. म्हणूनच कुसुमाग्रजांच्या स्मृतिला अभिवादन म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
तर ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त खास WhatsApp Status, Quotes, Wishes, Messages च्या माध्यमातून द्या ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा.
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/02/Marathi-Rajbhasha-Din-2024-Messages-6.jpg)
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/02/Marathi-Rajbhasha-Din-2024-Messages-2.jpg)
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/02/Marathi-Rajbhasha-Din-2024-Messages-5-1.jpg)
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/02/Marathi-Rajbhasha-Din-2024-Messages-4.jpg)
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/02/Marathi-Rajbhasha-Din-2024-Messages-1.jpg)
![](https://cmsmarathi.letsly.in/wp-content/uploads/2024/02/Marathi-Rajbhasha-Din-2024-Messages-3.jpg)
(हेही वाचा: Holi 2024 Date: या वर्षी होळीचा सण कधी साजरा होणार? हिंदू धर्मात या सणाला का आहे महत्त्व? जाणून घ्या)
दरम्यान, कुसुमाग्रजांचा जन्म नाशिक येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कवी कुसुमाग्रज यांचे एकूण 24 कविता संग्रह, 3 कादंबऱ्या, 16 कथा संग्रह, 19 नाटके आणि 4 लेखसंग्रह आदी साहित्य प्रसिद्ध आहे. 1964 मध्ये गोव्यात आयोजित ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे ते अध्यक्ष होते. 1974 मध्ये कुसुमाग्रज लिखित ‘नटसम्राट’ या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले.