दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज (Kusumagraj) यांच्या जन्मदिवशी मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din) साजरा केला जातो. कुसुमाग्रज हे मराठी भाषेतील प्रख्यात साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, थोर लेखक, नाटककार म्हणून ओळखले जातात. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. म्हणून आज त्यांच्या जन्मदिनी राज्यासह जगभरात जिथे कुठे मराठी लोक आहेत तिथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा केला जाईल.
कुसुमाग्रजांनी मराठी साहित्य, कवितेला नव्या उंचीवर नेऊन ठेवले व म्हणूनच त्यांच्या भाषेचा अभिमान आणि इतर भाषांचा आदर यासाठी भारत सरकारने त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केले. महाराष्ट्र सरकारने कविवर्य कुसुमाग्रजांच्या स्मरणार्थ 27 फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करावा असे 21 जानेवारी 2023 रोजी घोषित केले. (हेही वाचा: Marathi Official Language Day 2023 : मराठी राजभाषा दिन; महत्त्व, स्वरुप आणि विस्तार, घ्या जाणून)
तर आजच्या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी खास Images, Messages, Wishes शेअर करून द्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा.
दरम्यान, मराठी भाषेचा उगम नवव्या शतकापासून झाला असल्याचे समजतो. या भाषेची निर्मिती संस्कृत पासून झाली आहे. पैठण येथील सातवाहन साम्राज्याने प्रशासनात महाराष्ट्री भाषेचा सर्वप्रथम वापर केला. नंतर देवगिरीच्या यादव काळात मराठी भाषेची समृद्धी झाली. मराठी ही भारतातील अधिकृत 22 भाषांपैकी एक भाषा आहे. मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी 11 वी भाषा आहे तर भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा आहे. महाराष्ट्र तसेच गोवा या 2 राज्यांची मराठी ही अधिकृत राज भाषा आहे.