Marathi Bhasha Din 2022 Images: प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. 27 फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून ओळखला जातो. हा दिवस महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये अत्यंत उत्सहात साजरा केला जातो.
कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान आहे. त्यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. 21 जानेवारी 2013 पासून कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिनानिमित्त Messages, Banner, WhatsApp Status द्वारा तुम्ही आपल्या मित्र-परिवारास खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता. (वाचा - Marathi Bhasha Din 2022: मराठी भाषा दिनानिमित्त खास शुभेच्छा संदेश, Wishes, Quotes, पाहा व्हिडीओ)
बोलतो मराठी, ऐकतो मराठी!
जाणतो मराठी, मानतो मराठी!
मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा..!
मराठी भाषा दिनाच्या सर्व
महाराष्ट्रीयन जनतेला हार्दिक शुभेच्छा
जय महाराष्ट्र, जय मराठी!
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
महाराष्ट्रीयांचा अभिमान मराठी
भारताची आहे शान मराठी
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. भारतीय राज्यघटनेतील 22 अधिकृत भाषांच्या यादीत मराठीचा समावेश आहे. महाराष्ट्राबाहेरील एकूण 15 विद्यापीठांमध्ये मराठी शिकविली जाते.