Marathi Bhasha Din 2019 (Photo Credit: File Photo)

Marathi Language Day 2019: 27 फेब्रुवारी हा दिवस जगभरातील मराठी भाषिकांसाठी खास असतो. कारण या दिवशी 'मराठी भाषा दिन' साजरा केला जातो. मराठीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज म्हणजे वि. वा. शिरवाडकर यांचा हा जन्मदिवस. यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आपल्या भाषेचा सार्थ अभिमान असलेल्या प्रत्येक मराठी माणसाला शुभेच्छा देण्यासाठी खास मेसेजेस (Messages),GIF Images आणि व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp Status), आणि शुभेच्छापत्र....  मराठी भाषेचं सौंदर्य अधिक खुलवतात महाराष्ट्रातील या '14' मजेशीर बोली भाषा

रांगणाऱ्या तान्हुल्यापरी
गोंडस निरागस मराठी
तळपणाऱ्या दिनकरापरी
प्रखर अन् तेजस मराठी
ऊब देई आईच्यापरी
हळवी अन् लोभस मराठी
ओळखावी  विश्वभर ही

गोजिरी सालस मराठी

आभाळ कोसळले तरी
मी कोसळणार नाही
त्या कोसळलेल्या आभाळावर उभा राहून

ध्येयाकडे वाटचाल करेन

अंधार फार झाला,
आता दिवा पाहिजे
राष्ट्राला पुन्हा एकदा

जीजाऊंचा शिवा पाहिजे

रुजवू मराठी
फुलवू मराठी
चला बोलू

फक्त मराठी

लाभले आम्हांस भाग्य
बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य
ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक
जाणतो मराठी
एवढ्या जगात माय

मानतो मराठी

मराठी भाषा दिन हा मराठी भाषिकांसाठी एक सोहळा आणि उत्सव असतो. या खास शुभेच्छांसह हा दिवसअधिक खास करा.