श्रावण महिना आणि या महिन्यातील सण हे नवविवाहित मुलींसाठी खूपच महत्त्वाचा असतो. श्रावणातील पहिला सण नागपंचमी असून त्यानंतर एका एकेका सणाला सुरुवात होते. मात्र यंदा नागपंचमी पाठोपाठ मंगळागौर या सणाला सुरुवात झाली असून नवविवाहित मुलींचा उत्साह ही तितकाच वाढला आहे. नवविवाहित मुलींसोबत महिलाही एकत्र मोठ्या आनंदात आणि उत्साहात मंगळागौरीचा खेळ खेळतात. यात एकाहून एक सरस गाणी गायली जातात, फुगड्या घातल्या जातात. महिलांना रोजच्या कामातून थोडा वेगळा स्वत:साठी वेळ मिळावा, त्यात त्यांनी स्वत:ची आवड जोपासता यावी हे यामागचे उद्देश असते. मंगळागौर सणाला विशेष महत्व येते मंगळागौरीच्या खेळांमुळे.
यंदाची मंगळागौर ही खास करण्यासाठी मंगळागौरीचे खेळाचे प्रकार आणि ते खेळण्याची पद्धत माहित करुन घेण्यासाठी हे व्हिडिओ एकदा पाहाच-
हेही वाचा- Shravan 2019: श्रावण महिन्यातील मंगळागौर का आहे नवविवाहितेसाठी खास; यंदा कधी कराल साजरी?जाणून घ्या.
संस्कृती जपत मजामस्ती करण्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे मंगळागौर,पूर्वीच्या काळाच्या महिलांचा हा मनोरंजन आणि फिटनेस फंडा आजही सर्वत्र प्रसिद्ध आहे. कालांतराने या सणाचे स्वरूप आणि पद्धती जरी बदलले असले तरी आजही अनेक घरांमध्ये ही संस्कृती जपली जाते,इतकंच नव्हे तर अलीकडे या घरगुती मंगळागौरीचे मोठाले ग्रुप्स बनवून मोठमोठे कार्यक्रम व स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात.