Mahatma Phule Jayanti Images 2022: महात्मा ज्योतिबा फुले भारतीय एक समाजसुधारक, विचारवंत, समाजसेवक, लेखक, तत्त्वज्ञ आणि क्रांतिकारी कार्यकर्ते होते. त्यांना महात्मा फुले आणि जोतिबा फुले म्हणूनही ओळखले जाते. सप्टेंबर 1873 मध्ये त्यांनी महाराष्ट्रात सत्यशोधक समाज नावाची संघटना स्थापन केली. त्यांनी महिला आणि दलितांच्या उन्नतीसाठी अनेक कामे केली. समाजातील सर्व घटकांना शिक्षण देण्याचे ते खंबीर समर्थक होते. ते भारतीय समाजात प्रचलित जाती आधारित विभाजन आणि भेदभावाच्या विरोधात होते.
महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. आज त्यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी केली जात आहे. महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त खास मराठी Greetings, Wishes, Messages शेअर करून समाजसुधारकाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करा. यासाठी तुम्हाला खालील ईमेज डाऊनलोड करता येतील.
स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणे, बालविवाहाला विरोध करणे, विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा देणे हे ज्योतिबांचे मूळ उद्दिष्ट होते. समाजातील कुप्रथा आणि अंधश्रद्धेच्या जाळ्यातून समाजाची मुक्तता फुले यांना करायची होती. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षण देण्यात, महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यात घालवले.