भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि महाराष्ट्र या देशातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय राज्य आहे. महाराष्ट्र प्रतिवर्षी 1 जुलै रोजी कृषी दिन (Maharashtra Krishi Din 2022) साजरा करतो. 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत महाराष्ट्रात जवळपास आठवडाभर कृषी सप्ताह साजरा होतो. राज्यातील कृषी आणि हरीत क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांच्या स्मृतीप्रित्यार्थ हा सप्ताह आणि दिन साजरा केला जातो. 1 जुलै या दिवशी वसंतराव नाईक यांची जयंती असते. अशा या खास दिवशी बळीराजाला HD Images, Wishes, Messages, Whatsapp Status आदींच्या माध्यमातून महाराष्ट्र कृषी दिन निमित्त आपण सुभेच्छा देऊ शकता.
महाराष्ट्र कृषी दिन किंवा फक्त कृषी दिन म्हणूनही 1 जुलै हा दिवस साजरा होतो. कृषी दिन सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राज्यातील कृषी क्षेत्रात येत असलेल्या समस्या, कृषी क्षेत्राने केलेली प्रगती यांविषयी कृषी सप्ताहात विचारमंथन केले जाते.
कृषी दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारकडूनही काही उपक्रम राबविले जातात. यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीमत्वांचे कौतुक, नव्या योजनांची घोषणा, महत्वपूर्ण निर्णय यांसस विविध कार्यक्रमावरही भर दिला जातो. कृषी दिनाच्या उत्सवात विविध योजना, कार्यशाळा आणि व्याख्यानांचा समावेश असतो. प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या विवंचना, दुर्दशा यांसाह त्याच्या समस्यांवर उपाययोजना व्हावी.