Maharashtra Din 2021 HD Images: 1 मे रोजी 'कामगार दिन' तसेच 'महाराष्ट्र दिन' साजरा केला जातो. 1 मे हा दिवस महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन राज्ये त्यांचा स्थापना दिवस म्हणून साजरा करतात. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी ही दोन्ही राज्ये मुंबई राज्याचा भाग होती. या दिवशी 'महाराष्ट्र' राज्याची स्थापना झाली. यापूर्वी महाराष्ट्र व गुजरात यांचे वेगळे अस्तित्व नव्हते. दोन्ही राज्य मुंबईचा एक भाग होते. त्याकाळी, राज्यात मुंबई व गुजराती भाषा बोलणारे लोक सर्वाधिक होते.
मराठी व गुजराती भाषिक लोक स्वत: साठी स्वतंत्र राज्याची मागणी करीत होते. दोन्ही भाषांचे लोक दिवसेंदिवस आपली चळवळ तीव्र करीत होते. 1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन म्हणून साजरा करण्यात आला. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देणारे मराठी Greetings, Wishes, Banner शेअर करुन हा दिवस तुम्ही आणखी खास करू शकता. यासाठी तुम्हाला खालील ईमेजेस नक्की उपयोगात येतील.
जय जय महाराष्ट्र माझा...
गर्जा महाराष्ट्र माझा...
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा,
प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा,
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
ज्ञानाच्या देशा,
प्रगतीच्या देशा आणि संताचा देशा,
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!
महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा!
दरम्यान, 1 मे 1960 रोजी भारत सरकारच्या तत्कालीन नेहरू सरकारने मुंबई प्रदेशाची 'बॉम्बे पुनर्गठन अधिनियम 1960' अंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये विभागणी केली. या विभागणीनंतर दोन्ही राज्यांमध्ये मुंबईवरून वाद झाला. मुंबईत मोठ्या प्रमाणात मराठी लोक असल्याचं महाराष्ट्रातील लोकांचं म्हणण होतं. त्यानंतर अखेर मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली. महाराष्ट्र दिन विशेष करण्यासाठी राज्य सरकारतर्फे दरवर्षी 1 मे रोजी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.