Maharana Pratap Jayanti 2020 Images: आज वीर योद्धा राणा प्रताप सिंह (Maharana Pratap Singh) यांची 480 वी जयंती (Birth Anniversary) साजरी होत आहे. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार, महाराणा प्रताप यांची जयंती दरवर्षी 9 मे रोजी साजरी केली जाते. परंतु, हिंदू दिनदर्शिकेनुसार, ज्येष्ठ शुक्ल महिन्याच्या तिसर्या दिवशी महाराणा प्रताप यांची जयंती साजरी केली जाते. यावर्षी, 25 मे रोजी महाराणा प्रताप यांची जयंती साजरी केली जात आहे.
महाराणा प्रतापसिंह यांचे वडील महाराणा उदयसिंह हे होते. त्यांच्या आईचे नाव महाराणी जयवंताबाई असे होते. महाराणा प्रतापसिंह यांचा जन्म 9 मे इ. स. 1540 या दिवशी कुंभलगड येथे झाला. महान योद्धा महाराणा प्रताप यांना देशातील पहिला स्वातंत्र्य सैनिक मानलं जातं. महाराणा प्रताप हे सिसोदिया कुळातील हिंदू पराक्रमी राजपूत होते. वीरता आणि युद्ध कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त Wishes, HD Greetings, Wallpapers, Images शेअर करून आपल्या मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा द्या.
महाराणा प्रताप सिंग जयंती शुभेच्छा
महाराणा प्रताप एक वीर योद्धा होते. 2012 साली त्यांच्या जीवनावर 'महाराणा प्रताप: द फर्स्ट फ्रीडम फाइटर’ हा पहिला हिंदी चित्रपट काढण्यात आला. याशिवाय 'भारत का वीरपुत्र महाराना प्रताप' नावाची हिंदी मालिका देखील 2013 मध्ये प्रदर्शित झाली होती. या मालिकेचे 410 हून अधिक भाग प्रसारित झाले होते. या मालिकेत बाल प्रतापची भूमिका फैझल खान ने तर तरुण महाराणा प्रतापची भूमिका शरद मल्होत्राने केली होती.