Mahaparinirvan Din 2023 Special Songs: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काही खास भीमगीते ऐकून, महामानवाच्या स्मृतींना द्या उजाळा
Dr. Babasaheb Ambedkar (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. त्यांचा स्मृतिदिन महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din 2023) म्हणून ओळखला जातो. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक योगदानाच्या आणि कर्तृत्वाच्या आठवणीमध्ये 6 डिसेंबर हा दिवस व्यतीत केला जातो. यंदा बाबासाहेबांचा 67 वा महापरिनिर्वाण दिन आहे. आंबेडकरांचे दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले.

या दिनाचे औचित्य साधत बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने दादरच्या चैत्यभूमी येथे त्यांना आदरांजली वाहण्यासाठी जमतात. आपल्या बुद्धीमत्तेच्या आणि कर्तुत्वाच्या जोरावर अस्पृश्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्य व्यतीत केले. 'शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा' हा उपदेश त्यांनी दलितांना दिला. तसेच हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित व पीडितांचे पुनरुत्थान केले.

अशा या महामानवाला अभिवादन करणारी अनेक भीमगीते लोकप्रिय आहेत. यंदाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यातील काही निवडक भीमगीते ऐकून महामानवाच्या कार्याला द्या उजाळा.

(हेही वाचा: Mahaparinirvan Din Quotes in Marathi: महापरिनिर्वाण दिनानिमित्त WhatsApp Status, Greetings, Messages, Wishes च्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण करा आदरांजली!)

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी इंदौर जिल्ह्यामधील 'महू' येथे झाला. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून 1915 आणि 1916 मध्ये अनुक्रमे एमए आणि पीएच.डी. पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी बार-ऍट -लॉ आणि डी.एस्सी. पदवी देखील मिळवली. त्यांनी जर्मनीतील बॉन विद्यापीठातही काही काळ शिक्षण घेतले. आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.