
Easy Maha Shivratri Rangoli Designs: रांगोळी (Rangoli) ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे.भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते पण त्यामागील निहित भावनेत आणि संस्कृतीमध्ये बरीचशी समानता आहे.रांगोळीचा हेतू म्हणजे शक्ती, उदारता जाणवणे आणि नशीब मिळविणे हे आहे. परंपरा, लोकसाहित्य आणि प्रत्येक क्षेत्रासाठी खास असलेल्या पद्धती प्रतिबिंबित केल्यामुळे डिझाईनचे वर्णनदेखील भिन्न असू शकते. हे पारंपरिकपणे मुली किंवा महिलांनी केले आहे. साधारणता, सण, शुभ उत्सव, विवाह उत्सव आणि इतर समान टप्पे आणि मेळावे यासारख्या प्रसंगांमध्ये रांगोळ्या काढतात. (Maha Shivratri 2021 Do’s and Don’ts: महशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत? जाणून घ्या कशी साजरा कराल महाशिवरात्री )
उद्या (11 मार्च) ला आपण महाशिवरात्री साजरी करणार आहोत. या शुभ दिवशी आपण दारापुढे,अंगणात किंवा शिव च्या मंदिरापुढे रांगोळी काढतो. यंदा कोणती सोपी आणि आकर्षक रांगोळी काढू? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास महाशिवरात्रीसाठी काढता येतील अशा सुंदर आणि आकर्षक रांगोळी. चला मग पाहूयात.
महाशिवरात्री स्पेशल पोस्टर रांगोळी
पानांची डिझाइनची CD चा वापर करुन काढलेली डिझाइन
शिव देवाच्या प्रतिमेची पोर्ट्रेट रांगोळी
महाशिवरात्री फुलांची रांगोळी
शिवलिंग रांगोळी डिझाइन
भगवान शंकराची आराधना करून त्याला प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्री (Mahashivratri) हा दिवस फार विशेष मानला जातो. या दिवशीची भगवान शंकराची पूजा करून त्याची मनोभावे भक्ती केल्यास त्यांचे चांगले फळ मिळते असे पुराणात म्हटले.