
Maghi Ganesh Jayanti 2022 Images: या महिन्यात गणपतीशी संबंधित दोन महत्त्वाचे व्रत असतील, एक म्हणजे संकट चतुर्थी आणि दुसरी गणेश जयंती किंवा माघ विनायक चतुर्थी. हिंदी पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. याच दिवशी गणेशाचा जन्म झाला. या दिवसाला माघी गणेश चतुर्थी, माघ विनायक चतुर्थी किंवा तिलकुंड चतुर्थी असेही म्हणतात.
यंदा गणेश जयंती 4 फेब्रुवारी, शुक्रवारी साजरी होणार आहे. गणेश जयंतीच्या दिवशी उपवास करून श्रीगणेशाची जन्मकथा श्रवण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. याने तुमची सर्व कामे पूर्ण होतात. माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींना तसेच परिवाराला सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो, ग्रिटिंग, व्हाट्सअॅप स्टेटसद्वारे खास मराठी शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्हाला खालील ईमेजेस नक्की उपयोगात येतील. (वाचा - Ganesh Jayanti 2022: गणेश जयंतीची तारीख, पूजा मुहूर्त आणि महत्त्व, जाणून घ्या)





पौराणिक मान्यतेनुसार, श्री गणेशाची निर्मिती माता पार्वतीने केली. त्यावेळी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी होती. त्यामुळे या दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते. गणेश जयंतीच्या दिवशी विधीपूर्वक गणेशाची पूजा केल्याने तो प्रसन्न होतो, असा समज आहे.