माघ पौर्णिमा । File Images

हिंदू धर्मीयांसाठी माघ महिन्यातील पौर्णिमा ही विशेष महत्त्वाची आहे. या दिवशी गंगा नदी मध्ये भाविक डुबकी मारण्यासाठी येतात. सध्या प्रयागराज मध्ये महाकुंभमेळा सुरू असल्याने या माघ पौर्णिमेचं (Magh Purnima) महत्त्व विशेष वाढलं आहे. 12 फेब्रुवारीला माघी पौर्णिमेचं औचित्य साधून मोठ्या संख्येने भाविक त्रिवेणी संगमावर अमृत स्नानामध्ये सहभागी होणार आहेत. मग या पवित्र दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, मित्र मंडळींना देत या मंगलमय दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी WhatsApp Status, WhatsApp Messages, Facebook Messages, Wishes, Quotes द्वारा नक्की शेअर करा.

धार्मिक मान्यतेनुसार माघ पौर्णिमे दिवशी गंगास्नान आणि दान केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. स्कंद पुराणानुसार, माघी पौर्णिमेला स्नान केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि त्याच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा संचारते.

माघ पौर्णिमेच्या शुभेच्छा

माघ पौर्णिमा । File Images
माघ पौर्णिमा । File Images
माघ पौर्णिमा । File Images
माघ पौर्णिमा । File Images
माघ पौर्णिमा । File Images

धार्मिक मान्यतेनुसार, माघ महिन्यात देव पृथ्वीवर वास करतात. माघी पौर्णिमेला देवता देखील स्वरूप बदलून गंगा स्नानासाठी प्रयाग येथे येतात असे मानले जाते. म्हणूनच या तिथीचे धर्म ग्रंथात विशेष महत्त्व आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता अशी देखील अख्यायिका आहे त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. माघ पौर्णिमेच्या दिवसाचं औचित्य साधून भगवान विष्णू आणि लक्ष्मीची आराधना केल्याने सुख-समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो.