2020 हे लीप इयर असल्याने 29 फेब्रुवारी या दिवशी ज्यांचा वाढदिवस असतो त्यांच्यासाठी यंदाचं वर्ष खास असेल. दर 4 वर्षांनी लीप इयर येत असल्याने ज्यांचा बर्थ डे 29 फेब्रुवारीला असतो त्यांना यावर्षी जन्मतारखेनुसार आपला वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळणार आहे. लीप इयर असल्याने 29 फेब्रुवारी ही तारीख स्पेशल आहे. त्यामुळे या आयुष्यातील अनेक क्षण स्पेशल करण्यासाठी या दिवसाची निवड केली जाते. काही जण ठरवून 29 फेब्रुवारी दिवशी मुलांना जन्म देतात किंवा विवाहबंधनात अडकतात. मग जाणून घ्या कला, क्रीडा, राजकारण क्षेत्रात वावणार्या कोणत्या सेलिब्रिटींसाठी खास आहे 29 फेब्रुवारी ही तारीख. Leap Year 2020 Funny Memes: लीप इयरच्या निमित्ताने सोशल मीडियावर मिम्स चा पाऊस; तुम्ही पाहिलेत का?
भारतामध्ये सेलिब्रिटीपासून समान्यांपर्यंत 29 फेब्रुवारी दिवशी जन्मलेल्या व्यक्तींचं प्रमाण 0.07% पेक्षा कमी आहे. भारतीय सेलिब्रिटींचा विचार केला तर भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई ते रुक्मिणी देवी, अॅडम सिंक्लेअर यांचा जन्म लीप इयरच्या दिवशी झाला आहे.
मोरारजी देसाई
भारताचे पंतप्रधान पद भूषणारे मोरारजी देसाई यांचा जन्म 29 फेब्रुवारी 1896 दिवशी झाला होता.
अॅडम सिंक्लेअर
प्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू अॅडम सिंक्लेअर यांचा जन्मदिवस देखील लीप इयरच्या दिवशी येतो.
रूक्मिणी देवी
प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगणा रूक्मिणी देवी यांचा जन्म देखील 29 फेब्रुवारी दिवशी झाला आहे. त्या 'भरतनाट्यम' या नृत्यप्रकारात निष्णात होत्या.
पर्ण पेठे - आलोक राजवाडे
पर्ण पेठे आणि आलोक राजवाडे यांच्य लग्नाचा वाढदिवस 29 फेब्रुवारी दिवशी असतो. त्यांच्या लग्नानंतर यंदा पहिल्यांदाच लीप इयर दिवशी त्यांना लग्नाचा वाढदिवस ताराखेनुसार साजरा करण्याची संधी मिळणार आहे.
Lena Gercke
Lena Johanna Gercke या प्रसिद्ध फॅशन मॉडेल आणि टेलिव्हिजन होस्ट यांचा जन्मदिवस देखील 29 फेब्रुवारी हा आहे.
प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्मानंतर चार वर्षांनी पहिल्यांदा लीप इयर आलं होतं. त्यानंतर दर वर्षांनी लीप येते. पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवस आणि 6 तास लागतात. त्यानुसार दर वर्षांनी 366 दिवस येतात. त्यामुळे फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असतो.