Leap year memes (Photo Credits: Instagram)

यंदाचे वर्ष म्हणजेच 2020 हे खास असण्याचे आणखीन एक कारण म्हणजे यंदा लीप वर्ष (Leap Year) आहे, लीप इयर म्हणजेच चार वर्षातून एकदा जुळून येणारा योग, फेब्रुवारी (February)  महिन्यात लीप इयर च्या निमित्ताने 29 दिवस असतात, ज्यानुसार वर्षात एक एक्सट्रा दिवस मिळतो. हा दिवस तुम्हाला हसत खेळत आणि आनंदात घालवायचा असेल तर तुमच्यासाठी हे आर्टिकल उत्तर ठरू शकते. अलीकडे कोणतीही छोटी मोठी गोष्ट पण सोशल मीडियावर येताच मीम (Meme) बनून जाते, दोन कोणत्या तरी वेगळ्या गोष्टींना जोडून त्यातून मजेशीर प्रसंग तयार करणे ही या मिम्सची पॉवर म्हणता येईल. यंदा लीप इयरच्या निमित्ताने सुद्धा असेच काही मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नेटकऱ्यांची ही हटके क्रिएटिव्हिटी पाहून तुम्हीही हसल्यावाचून राहू शकणार नाही, मग वाट कसली पाहताय चला तर पाहुयात लीप इयर स्पेशल व्हायरल मिम्स..

That's A Trick

 

जर का 29 फेब्रुवारीला तुमचा वाढदिवस असेल तर..

 

दरम्यान, फेब्रुवारी हा महिना वर्षातील सर्वात कमी म्हणजेच 28 दिवसांचा असतो, लीप इयरच्या निमित्ताने या महिन्यात 29 दिवस येतात, म्हणजेच वर्षभरात 365 ऐवजी 366 दिवस मिळतात, या दिवसाला वाया न घालवता तुमच्यासाठी फायदेशीर असं काही करा. हसण्याने होणारा फायदा लक्षात घेता बाकी काही नाहीतर निदान थोडा हसून हा दिवस घालवलात तरी पुरे!